आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनता बँकेच्या निवडणुकीत दाेन पॅनलमध्येच सरळ लढत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राज्यभरात ४५ हजार सभासद असलेल्या जळगाव जनता बँकेसाठी येत्या रविवारी मतदान घेण्यात येणार आहे. बँकेचे संस्थापक डाॅ.अविनाश आचार्य यांच्या पश्चात होणाऱ्या पहिल्याच निवडणुकीत दोन पॅनलमध्ये लढत होणार आहे. दरम्यान, एकूण १७ पैकी जागा माघारीच्या वेळेत बिनविरोध निवडून आल्याने आता उर्वरित १४ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी २१ इच्छुक उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. रविवारी राज्यातील ७० केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे.

डाॅ.अविनाश आचार्य यांच्या कन्या डाॅ.आरती हुजूरबाजार, अनिल राव, डाॅ.प्रताप जाधव यांच्या गटाचे पतंग चिन्ह असलेले एक पॅनल असून विरोधात सुभाष शौचे, डाॅ.संजय भोकरडोळे यांचे नारळ हे चिन्ह असलेले पॅनल समोर आहे. कप-बशी चिन्ह असलेले महेश मंडोरे हे स्वतंत्र उमेदवार आहेत. बँकेचे विद्यमान अध्यक्ष संजय बिर्ला हे या वेळी उमेदवार नाहीत. मात्र, त्यांनी पॅनलच्या उमेदवारांमध्ये १३ नवीन चेहरे दिले आहेत. जळगाव जनता बँकेचे जळगाव, धुळे, नंदुरबार, पुणे, मुंबईसह राज्यभरात ४५ हजार सभासद आहेत. तीन राखीव प्रवर्गामध्ये विरोधातील उमेदवारांनी माघार घेतल्याने अनुसूचित जाती प्रवर्गातून बन्सीलाल अंदोरे, भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातून सुभाष लाेहार आणि इतर मागास प्रवर्गातून विवेक पाटील हे बिनविरोध निवडून आले आहेत. येत्या रविवारी १४ जागांसाठी निवडणूक होत आहे.

हे आहेत उमेदवार
सर्वसाधारणमतदारसंघ - दीपक अट्रावलकर, हेमंत भोकरडोळे, डाॅ.संजय भोकरडोळे, जयेश दोशी, डाॅ.प्रताप जाधव, सुरेश केशवाणी, राजेंद्र लढ्ढा, सतीश मदाने, महेश मंडोरे, अनिल राव, डाॅ.अतुल सरोदे, सुभाष शौचे, जयंती सुराणा, ज्ञानेश्वर वाणी, हरिश्चंद्र यादव. सर्वसाधारण मतदारसंघ जिल्ह्याबाहेरील - रवींद्र बेलपाठक, प्रमोद भोकरडोळे, कृष्णा कामठे. महिला राखीव प्रवर्ग - डाॅ.आरती हुजूरबाजार, मनीष पवार, सावित्री सोळुंखे.