आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जनसाधारण एक्स्प्रेस तासभर रखडली;‘त्या’ रेल्वे गार्डची होणार चौकशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- मुंबईकडे जाणार्‍या जनसाधारण एक्स्प्रेसचा गार्ड आणि त्याच्या पत्नीमध्ये झालेल्या वादामुळे गाडी 50 मिनिटे रेल्वे स्थानकावर रखडली. हे प्रकरण रेल्वे प्रशासनाने गांभिर्याने घेतले आहे. संबंधित गार्डची चौकशी होणार असल्याचे डीआरएम कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.

गुरूवारी पहाटे 1.25 वाजता जनसाधारण एक्स्प्रेस भुसावळ जंक्शन स्थानकावर प्लॅटफार्म एकवर आली. या गाडीवर असलेले गार्ड जी.जी. गुप्ता आणि त्यांच्या पत्नीचे गार्ड डब्याजवळच वाद झाले. या वादामुळे गाडी तब्बल 50 मिनिटे स्थानकावर थांबून होती. प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. ऐनवेळी दुसरा गार्ड गाडीवर पाठवून गाडी मुंबईकडे रवाना करावी लागली होती.

या सर्व प्रकाराची गंभीर दखल रेल्वे प्रशासनाने घेतली आहे. या प्रकरणाची रितसर चौकशी होईल, असे एडीआरएम प्रदीप बारापात्रे यांनी सांगितले. दरम्यान, शुक्रवारी ‘दिव्य मराठी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘गार्ड-पत्नीचा वाद, एक्स्प्रेस तासभर रखडली’ या वृत्ताची रेल्वे कर्मचार्‍यांमध्ये दिवसभर चर्चा होती. अधिकार्‍यांमध्येही याबाबत खळबळ उडाली.

गंभीर प्रकार
रेल्वे गार्ड आणि त्याची पत्नी यांच्यात झालेल्या वादामुळे गाडी लेट होणे ही गंभीर बाब आहे. रेल्वेच्या नियमानुसार सखोल चौकशी होईल. अहवाल आल्यावर संबंधित गार्डवर कारवाई होईल.
-महेशकुमार गुप्ता, डीआरएम, भुसावळ