आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्षा बंदचा प्रवाशांना फटका, नगर जिल्ह्यातील हत्याकांडाच्या निषेधार्थ शहरात आंदोलन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- नगरजिल्ह्यातील जवखेडे येथील दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ शहरातील महानगर ऑटो रिक्षाचालक मालक संघटनेतर्फे बंद पाळून निषेध करण्यात आला. या बंदचा फटका लहान मुले, महिला वृद्धांना अधिक बसला. प्रामुख्याने बाहेरगावाहून शहरात दाखल झालेल्या नागरिकांना याचा अधिक त्रास सहन करावा लागला.
संघटनेने रिक्षा बंदबाबत आवाहन केले होते, त्यानुसार बंदमध्ये िरक्षाचालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. येत्या बुधवारपासून दिवाळीची सुटी संपून शाळा सुरू होत असल्याने सहलीला गेलेली अनेक कुटुंब रविवारी शहरात परतली. त्यात सकाळी रेल्वेने येणाऱ्यांची संख्या अधिक हाेती. त्यांना या बंदची कल्पना नसल्याने त्यांची पंचाईत झाली. सोबतचा मोठे सामान घेऊन त्यांना थेट नेहरू चाैकापर्यंत पायपीट करावी लागली. सकाळी ते दुपारी या वेळेत रिक्षा बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, नागरिकांच्या सोयीसाठी दुपारी वाजेनंतर आंदोलन मागे घेण्यात आल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले.
शकडो रिक्षाचालकांचा उत्स्फूर्त सहभाग
सकाळीवाजता रेल्वेस्थानकाबाहेरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास जिल्हाध्यक्ष राजू मोरे यांनी पुष्पहार अर्पण केला. या वेळी जवखेडे हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अहमदनगर जिल्हा दलित अत्याचार पीडित म्हणून घोषित करावा, दलितांना स्वसंरक्षणार्थ शस्त्र परवाना द्यावा, अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या. बंद यशस्वी करण्यासाठी नारायण सपकाळे, शांताराम अहिरे, छोटू निकम, अॅड. गोविंद तिवारी, इस्माईल शाह, किरण वाघ, बापू निकम, मिलिंद सोनवणे, भास्कर सपकाळे, सुनील सपकाळे, कल्पेश मोरे, पिंटू मलिक, सुनील जाधव, जे.डी.भालेराव यांनी प्रयत्न केले. बंदमध्ये शहरातील शेकडो रिक्षाचालक सहभागी झाले होते.