जळगाव- जवखेडे(जि. अहमदनगर) येथे झालेल्या दलित कुटुंबातील तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण मिळाले. या मोर्चातील काही तरुणांनी टॉवर चौक ते बसस्थानकादरम्यान २५ मिनिटांत १४ दुकाने, हॉस्पिटल, वाहने फोडली. यात तीन दुकानदार जखमी झाले आहेत.
पोलिसांनी मात्र बघ्यांची भूमिका घेतली. बसस्थानकाजवळ मोर्चेकऱ्यांना रोखण्याचा केविलवाणा प्रकार पोलिसांनी केला. अनुसूचित जाती-जमाती, भटके-विमुक्त आणि ओबीसी अन्याय-अत्याचारविरोधी संघर्ष समितीतर्फे मोर्चा काढण्यात आला.प्रचंड घोषणा देत असतानाच मोर्चातील कार्यकर्त्यांनी टॉवर चौकातील खादी भंडारवर दगडफेक करून दहशत माजवण्यास सुरुवात केली. रस्त्यात येणाऱ्या काचेच्या दुकानांवर अचानकपणे दगडफेक करून त्यांनी संपूर्ण परिसरातच गोंधळ माजवला. ते एकाच रांगेत असलेल्या सलग पाच-सहा दुकानांवर दगड फेकून पळून जात होते. बाहेर काय सुरू आहे याचा अंदाज नसतानाच दुकानांमध्ये दगडांचा मारा झाला. काचा फुटण्याच्या आवाजाने सर्वच जण प्रचंड घाबरले. मोर्चेकऱ्यांवर दगडफेक केल्याचे कळताच बंदोबस्त पाठवला होता. जे दोषी आढळून येतील त्या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. सीसीटीव्ही फुटेजची मदत घेऊन उपद्रवींचा शोध घेतला जाईल, असे पोलिसस उपअधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी सांगितले.
मोर्चा शांततेच्या मार्गाने जात असताना काही विघ्नसंतोषींनी दुकानांवर दगडफेक केली. समितीला बदनाम करण्याच्या उद्देशाने ते यात सहभागी झाले होते. दुष्प्रवृत्तीच्या लोकांनी हे काम केले आहे. त्यात समितीचा कुठलाही सहभाग नाही. मुकुंदसपकाळे, जिल्हाध्यक्ष,अन्याय-अत्याचारविरोधी संघर्ष समिती टॉवर चौकातील खादी ग्रामोद्योगावर केलेली दगडफेक अनुसूचित जाती-जमाती, भटके- विमुक्त आणि ओबीसी अन्याय-अत्याचारविरोधी संघर्ष समितीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात.
ही दुकाने फोडली
सोनीड्रायफ्रुट अॅण्ड जनरल स्टोअर टीप टॉप, लिनन क्लब, फ्रुट प्रिंट, तरुण आयदासानी यांचे ऑप्टिक हट आणि मनोज खिरोदिया यांचे मधुरम ही एकाच रांगेतील दुकाने फोडली आहेत. या शिवाय टॉवर चौकातील खादी भंडार, पंचवटी हॉटेल, मॉम अॅण्ड मी शॉप, स्टेडियम कॉम्प्लेक्समधील मद्रास कॅफे, आशीर्वाद क्लिनिक, कोठारी हॉस्पिटल, गाजरे हॉस्पिटल, दिलीप विविध उद्योग, हॉटेल कृष्णा, नवजीवन सुपर शॉप, हॉटेल गॅलेक्सी आणि कोगटा अॅक्सिडेंट हॉस्पिटल
रुग्णालयांवरही दगडफेक
मोर्चेकऱ्यांनीमाणुसकीची तमा बाळगता थेट रुग्णालय, अॅम्बुलन्सवरही हल्लाबोल केला. यात गाजरे हॉस्पिटल, कोठारी हॉस्पिटल, आशीर्वाद क्लिनिक आणि कोगटा अॅक्सिडेंट हॉस्पिटल या चार रुग्णालयांच्या काचा फोडल्या. या प्रकारामुळे रुग्ण आणि नातेवाईक भयभीत झाले होते.