आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासऱ्याच्या बाराव्यास गळफास घेऊन जावयाची आत्महत्या;एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- सासऱ्याच्या बाराव्याला जावयाने गळफास घेऊन अात्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी वाजता गणेशवाडी परिसरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली अाहे. 
 
रिक्षाचालक विनोद फकिरा राक्षे (वय ३८) त्यांची पत्नी अाणि मुलगा यश (वय १२), मुलगी पायल (वय १४) यांच्या साेबत राहत हाेते. नेरी नाक्याजवळ रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. बुधवारी विनोद यांचे सासरे अाधार मराठे यांचा तुकारामवाडीत बाराव्याचा कार्यक्रम हाेता. त्यामुळे पत्नी, मुले त्या ठिकाणीच हाेते. विनोद हे घरी एकटेच हाेते. दुपारी त्यांचा शालक गाेकुळ अाधार मराठे यांनी जेवण करण्यासाठी फाेन केला. सुरुवातीला फाेन स्विच अाॅफ अाला. त्यानंतर जेवणास बाेलवल्यानंतरही अाले नाहीत. सायंकाळी वाजता विनोद यांच्या साडूचा मुलगा जितेंद्र मराठे याला त्यांना बोलावण्यासाठी पाठवले. त्या वेळी त्याने दरवाजा ठाेठावला. मात्र, दरवाजा उघडल्याने त्याने फटीतून बघितले. त्या वेळी त्याला विनाेद यांनी गळफास घेतल्याचे दिसले. त्याने ही माहिती नातेवाईकांना दिली. 

धाव घेत घटनेची माहिती दिली 
जितेंद्र मराठे त्याने आरडा-ओरडा करीत तुकारामवाडीकडे धाव घेत नातेवाइकांना घटेनची माहिती दिली. यानंतर कुटुंबीयांनी गणेशवाडी गाठत विनोद यांना खाली उतरवले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डाॅक्टरांनी सिव्हिलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. त्या ठिकाणी आपत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घाेषित केले. 
बातम्या आणखी आहेत...