आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन मुलींच्या पाठीवर झालेला मुलगा भावाला दत्तक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मुलगा म्हणजे वंशाचा दिवा अशी मानसिकता असणा-या आपल्या समाजात लोक मुलासाठी वाट्टेल ते करतात. अशावेळी दोन मुलींच्या पाठीवर झालेला मुलगा थोरल्या भावास दत्तक देण्याची दुर्मिळ पण आदर्श घटना शहरात घडली.
जयंत रघुनाथ जोशी त्यांची पत्नी ललिता या दांपत्याने हे औदर्य दाखवले आहे. जयंत यांचा थोरला भाऊ प्रशांत वहिनी मंगला यांच्या लग्नाला १५ वर्षे होऊनही मूलबाळ होत नसल्याने त्यांना आपला साडेचार महिन्यांचा मुलगा दत्तक दिला. शनिवारी संध्याकाळी समाजातील प्रतिष्ठित नागरिक अाणि नातेवाइकांच्या उपस्थितीत हे दत्तक विधान झाले. प्रशांत जयंत हे दोन्ही भाऊ विवेकानंद प्रतिष्ठानच्या शाळेत विद्यार्थ्यांची ने-आण करण्याचे काम करतात. ते नवीन जोशी कॉलनीत राहतात. जयंतचे वर्षांपूर्वी लग्न झाले. त्याला पहिल्याच वर्षी कन्यारत्न झाले. ती ‘वैष्णवी’ आता वर्षांची आहे. त्यापाठाेपाठ झाली ‘दर्शना’. ती तीन वर्षांची आहे. दोन्ही मुलींच झाल्या. त्यानंतर तीन अपत्यांचा भार सोसणे शक्य होणार नाही असा व्यावहारिक विचार करून त्यांनी तिसरे अपत्य होऊ देण्याचा निर्णय घेतला. तरीही ललिता हिला गर्भधारणा राहिली. तेव्हा थोरला भाऊ आणि भावजयीला अपत्य नसल्यामुळे जन्माला येणारे हे बाळ त्यांना दत्तक द्यायचे असा विचार जयंत त्यांच्या पत्नीने केला.हर्षच्या रुपाने त्यांना मुलगा झाला मात्र दोन मुलींच्या पाठीवर मुलाचा जन्म घेऊनही जयंत ललिता यांनी "वंशाच्या दिव्याचा' मोह दूर सारून भावाला दिलेला शब्द पाळत नवा आदर्श घालून दिला.
बाळाची जबाबदारी तिस-या महिन्यापासून
जयंतचीपत्नी ललिताच्या पोटातील बाळ दत्तक देण्याचा निर्णय गर्भधारणेच्या तिसऱ्या महिन्यात झाल्यानंतर प्रशांत मंगला यांनी सर्व जबाबदारी उचलली. बाळ जन्माला अाल्यापासून ते दत्तक विधान होईस्‍तोवर बाळ अाई जवळ केवळ दूध पिण्यासाठीच असते. उर्वरित वेळ मंगला ह्याच त्याचा सांभाळ करतात.
‘हर्ष’ने दिला दोन कुटुंबांना आनंद
शनिवारीदत्तक विधानसोबत बाळाच्या नामकरणाचा साहेळा झाला. बाळाचे नाव हर्ष ठेवण्यात आले. हर्ष म्हणजे आनंद ख-या अर्थाने सार्थक झाले. त्याने दोन आईंना आनंद दिला. एकीला मातृत्वाचा दुसरीला दातृत्वाचा. 80 च्या दशकातील जितेंद्र-जयाप्रदा अभिनीत "स्वर्ग से सुंदर' चित्रपटाचेही अशाच प्रकारचे कथानक होते. यात जितेंद्र-जयाप्रदा आपला मुलगा धाकटा भाऊ मिथुन चक्रवर्ती-पद्ममिनी कोल्हापुरेला देतात.