आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • JCI Mission At Jalgaon Student Discount To All Educational Materials

जेसीआयचा उपक्रम: गुणवंतांनो, मिळवा आवडीच्या खरेदीवर भरपूर सवलत!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- पाचवी ते बारावीपर्यंत 75 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांना जेसीआय जळगावतर्फे मोफत स्टुडंट फॅसिलिटी कार्ड देण्यात येणार आहे. या कार्डमुळे विद्यार्थ्यांना अनेक ठिकाणी आर्थिक फायदा होणार आहे.

गुणवंत विद्यार्थ्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तू तसेच शैक्षणिक कोर्सेसमध्ये डिस्काउंट, काही कोर्सेस मोफत देण्याचा मानस जेसीआयने केला आहे. त्यासाठी संस्थेने शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांची माहिती मागविणे सुरू केले आहे. या योजनेसाठी शहरातील 150 पेक्षा जास्त व्यावसायिकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. विद्यार्थ्यांना विशिष्ट प्रकारचे कार्ड देण्यात येणार आहे. हे कार्ड दाखविल्यानंतर विद्यार्थ्यांना अनेक ठिकाणी फायदा होणार आहे.

फॅसिलिटी कार्डासाठीची प्रक्रिया सुरू
गुणवंत विद्यार्थ्यांना हे कार्ड मिळवण्यासाठी संस्थेतर्फे प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकेची झेरॉक्स व दोन पासपोर्ट साईज फोटोंसह छत्रपती शिवाजी महाराज क्रीडासंकुलातील ब्रिलियंट इन्फोटेक (डी 34) या ठिकाणी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे. या योजनेची माहिती विद्यार्थ्यांना www.brilliantssfc.com या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.