आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवासी जीपची दुचाकीला धडक; तिघे गंभीर जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सलगतीन दिवस सुट्यांच्या निमित्ताने गावी गेलेल्या जिल्हा काेषागार कार्यालयातील कर्मचाऱ्याच्या दुचाकीला परत येताना टाटा मॅिजक या प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीने जाेरदार धडक दिली. यात त्यांच्यासह त्यांची पत्नी मुलगी असे तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली.
चाैथा शनिवार, रविवार अािण साेमवारी पाेळा या सलग तीन दिवस सुट्या असल्याने जिल्हा काेषागार कार्यालयातील कर्मचारी हेमंत साहेबराव ठाकरे (वय ४२, रा. वाघनगर) हे पत्नी भावना ठाकरे (वय ३८), मुलगी तेजल (११), काेमल (९) अािण मुलगा कल्पेश (वय दीड वर्षे) हे मुक्ताईनगर तालुक्यातील पंचाणे येथे त्यांच्या मूळगावी गेले हाेते. मंगळवारी हे पाचही जण हीराे हाेंडा स्प्लेंडरने (एमएच १९, बीएच ९६५५) जळगावकडे परत येत हाेते. सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास मण्यारखेडा परिसरात टीव्ही टाॅवरजवळ समाेरून भरधाव येणाऱ्या टाटा मॅिजक (एमएच १९ वाय, ५६८९) या कालीपिली गाडीने त्यांच्या माेटारसायकलला जाेरदार धडक िदली. त्यात हेमंत यांच्या डाेक्याला, पत्नी भावना यांच्या पायाला तर मुलगी तेजल हिच्या ताेंडाला गंभीर दुखापत झाली अाहे. सर्व जखमींना गणपती हाॅिस्पटलमध्ये दाखल करण्यात अाले अाहे.

जामनेर,भुसावळ रस्त्यावर महुखेड्याजवळ मंगळवारी दुपारी वाजेच्या सुमारास एका दुचाकीला भरधाव येणाऱ्या टाटा ४०७ने समाेरून धडक दिली. यात एक तरुण ठार तर दाेघे जण गंभीर जखमी झाले अाहेत. जामनेर तालुक्यातील महालखेडा येथील अर्जुन उत्तम राठाेड (वय २१), संदीप भाेदू नाईक (२०) अािण एकनाथ बाबू नाईक (२५) हे कामािनमित्त मंगळवारी जामनेरला गेले हाेते. ते महालखेडा येथे हीराे एक्सट्रीम या गाडीने परत येत असताना महुखेड्याजवळ टाटा ४०७ गाडीने त्यांच्या माेटारसायकलला जाेरदार धडक दिली. या अपघातात अर्जुन हा जागीच ठार झाला तर संदीप अािण एकनाथ हे गंभीर जखमी झाले अाहेत. तिघांना सायंकाळी वाजेच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात अाले अाहे.