आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाेरट्यांनी लांबवले ताेळे साेन्याचे दागिने सिद्धिविनायक काॅलनीत बंद घर चोरांनी फोडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव : पिंप्राळ्यातील अासावानगर परिसरातील सिद्धिविनायक काॅलनीतील बंद घर फाेडून चाेरट्यांनी ताेळे साेन्याच्या दागिन्यांसह लाख ३६ हजार ९०० रुपयांचा एेवज लंपास केला अाहे. शुक्रवारी रात्री १० वाजता बाहेरगावाहून परत अाल्यानंतर घरमालकांना चाेरी झाल्याचे समजले. याप्रकरणी शनिवारी रामानंदनगर पाेलिस ठाण्यात चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.
 
दरम्यान, अासावानगर परिसरातील गेल्या तीन महिन्यांतील तिसरी माेठी चाेरी झाली अाहे. 
सिद्धिविनायक काॅलनीतील प्लाॅट क्रमांक ३८ मध्ये सचिन रामेश्वर डगवाल (वय ३६) हे त्यांच्या कुटुंबीयांसह राहतात. ते जानेवारी राेजी दुपारी वाजता कुटंुबीयांसह नागपूर येथे गेले हाेते. तर त्यांनी अाई-वडिलांना त्यांच्या वाशिम या मूळ गावी साेडले हाेते. त्यामुळे घर बंद हाेते.
 
सर्व कामे अाटाेपून सचिन डगवाल शुक्रवारी रात्री १० वाजता नागपूर येथून परत अाले. त्या वेळी त्यांच्या कंपाउंडच्या गेटचे कुलूप लावेले हाेते. मात्र, घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकाेयंडा तुटलेला दिसला. त्यांना घरातही सर्व साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले दिसले. बेडरूममध्ये बघिल्यावर लाेखंडी कपाटाचा दरवाजा ताेडलेला हाेता. घरात चाेरी झाल्याचे लक्षात अाले. 
 
तीन महिन्यांत तीन माेठ्या चाेऱ्या
पिंप्राळ्यातील अासावा नगर परिसरात अाॅक्टाेबर महिन्यापासून तीन माेठ्या घरफाेड्या झाल्या. यात २२ अाॅक्टाेबर राेजी अष्टविनायक काॅलनीतील उदय रवींद्र बडगुजर या शिक्षकाच्या बंद घरातून चाेरट्यांनी लाख ९३ हजार ३५० रुपयांचा एेवज लंपास केला हाेता. तर काही दिवसांनंतर अशाच पद्धतीची चाेरी चाेरट्यांनी केली हाेती. तर ते जानेवारीदरम्यान सचिन डगवाल यांच्या घरात तिसरी चाेरी झाली अाहे. 

लाख ३७ हजारांचा एेवज चाेरीस 
डगवालहे ते जानेवारीपर्यंत गावाला गेले हाेते. त्यामुळे घर बंद हाेते. ही संधी साधून चाेरट्यांनी घरातून अाठ ताेळे साेन्याचे दागिने, हजार रुपयांचे चांदीचे दागिने अाणि हजार रुपये राेख असा एकूण लाख ३६ हजार ९०० रुपयांचा एेवज लंपास केल्याचे लक्षात अाले. त्यांनी शनिवारी याप्रकरणी रामानंदनगर पाेलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. 
बातम्या आणखी आहेत...