आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांची चाहूल लागताच बॅग सोडून चोरट्यांनी ठोकली धूम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - नवीपेठेतीलसुरेश कलेक्शनसह दोन दुकानात शनिवारी मध्यरात्री चोरी करणाऱ्या चाेरट्यांनी मंगळवारी पहाटे ३.३० वाजता दाणाबाजारातील तीन दुकाने फोडली. या दुकानातून त्यांनी ४०० रुपयांची रोकड लंपास केली. दाणाबाजारातील चोपडा ट्रान्सपोर्ट येथे चोरी करीत असतानाच एका व्यापाऱ्याने पाेिलसांना फाेन केला. पाेिलस घटनास्थळी पाेहचल्याचे पाहून चोरट्यांनी स्वत: जवळील बॅग सोडून धूम ठाेकली.
चाेरट्यांनी घटनास्थळी साेडलेल्या बॅंगेमध्ये सुरेश कलेक्शनमध्ये चोरी केलेल्या ६० हजार रुपयांपैकी ५६ हजार रुपये आिण चांदीचे शिक्के अन्य तीन किलाे वजनाचे दािगने तसेच अशाेक नटवर येथे चित्रपट पािहल्याचे तिकीटे अाढळून अाली अाहेत. पोलिसांनी सुरेश कलेक्शनचे मालक मुकेश हसवाणी यांना बोलावून मिळालेले पैसे चांदीचे शिक्के यांची ओळख पटवली. शहरात सात दुकाने फोडणारी तिघांची टोळी चार दिवसांपासून जळगावात असून ते पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोऱ्या करत असल्याने अाश्चर्य व्यक्त होते.
असाझाला थरार : याितघा चोरट्यांनी दाणाबाजारातील तीन दुकाने फोडल्यानंतर साेमवारी रात्री ३.३० वाजता ते मागच्या गल्लीतील सुभाष ट्रेडिंग कंपनीच्या गच्चीवर आले. दुकानमालक सुभाष तोतला हे वरच्या मजल्यावर राहतात. त्यांना चोरट्यांची चाहूल लागल्यानंतर त्यांनी घरातील सीसीटीव्हीचे बटण सुरू केले. यात त्यांना चोरटे दिसून आले. तोतला यांनी छतावर धाव घेण्यापूर्वी पोलिसांना यािवषयी मािहती दिली. त्यानंतर तोतला छताकडे जात हाेते. यांची चाहूल चाेरट्यांना लागली. याचदरम्यान शहर पोलिस ठाण्यातून सुमारे १५-२० पोलिसांचा ताफा दाणाबाजारात पोहाेचला. मात्र, ताेपर्यंत चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले हाेते. पहाटे वाजेपर्यंत पोलिसांनी परिसर पिंजून काढला. मात्र चोरटे पोलिसांच्या एक पाऊल पुढे निघाले होते. १५ दिवसांपूर्वी तोतला यांच्या याच सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये एक चोरटा कैद झाला होता. त्याला शहर पाेलिसांनी अटक केली होती. खान्देश शॉपिंग कॉम्पलेक्स येथील महाराष्ट्र बँकेत झालेल्या चोरी प्रकरणात संशयित म्हणून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याच्याकडे काहीही मुद्देमाल मिळाला नसून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
चाेरट्याने फेकलेल्या बॅगची तपासणी करताना पाेिलस कर्मचारी.

चोपडा ट्रान्सपोर्ट नागोगणू वाणी यांच्या दुकानाच्या वरच्या मजल्यावर शरद त्रिभूवन शाह यांच्या मालकीचे हे दुकान आहे. गेल्या काही वर्षांपासून ते बंदच आहे. चोरट्यांनी या दुकानाच्या लाकडी दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश केला. आत ठेवलेले दोन लोखंडी कपाट फोडून त्यात ठेवलेल्या वाहनांचे स्पेअर पार्ट तपासले. मात्र, चोरी केली नाही. याच दुकानात चाेरट्यांची बॅग मिळून आली.
विपुल एंटरप्रायजेस विपुलरमेशचंद्र गांधी यांच्या मालकीचे हे दुकान आहे. या दुकानाच्याही छतावरील लोखंडी ग्रीलचा दरवाजा वाकवून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. काउंटरवरील एक ड्रावर तोडून त्यातून चावी घेऊन दुसरे ड्राॅवर उघडले. यात ठेवलेले ४०० रुपये चोरून नेले.
मे.जयप्रकाश बाळकृष्ण झवर यांच्यादोन मजली दुकानाच्या गच्चीहून लोखंडी गेटच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. सर्वात खालच्या मजल्यावर असलेले काउंटरचे ड्राॅवर उघडून त्यातून एक हजार रुपयांची चिल्लर चोरली. मात्र, ही चिल्लर गच्चीवर सोडून चोरटे निघून गेले.