आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरीचे आमिष दाखवून सहा लाखांची फसवणूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - परदेशात शिपिंग कंपनीत नोकरीस लावून देण्याचे आमिष देऊन पारोळा व साक्री तालुक्यातील दोघांची सहा लाखात फसवणूक करणार्‍या उत्तरप्रदेश येथील सूर्या राजेंद्रप्रसाद वर्मा याला एलसीबीच्या पथकाने अटक केली.

पारोळा तालुक्यातील तामसवाडीचा सुदर्शन मोतीराम पाटील आणि साक्री तालुक्यातील कसारे येथील संदीप आबासाहेब अहिरराव दोघांचेही डिप्लोमा इन नॉटिकल सायन्सचे शिक्षण झाले होते. त्यांनी नोकरीसाठी ओशियन इन्स्पायर शिपिंग मॅनेजमेंट (रायपूर)या कंपनीच्या ई-मेलवर जॉब सर्च केला. तेथून त्यांना विविध शिपिंग कंपन्यांची माहिती कळविण्यात आली. यानंतर उत्तर प्रदेश येथील गोंडा (जि.तरफगंज) येथील सूर्या वर्मा याने एमव्ही डॉनम या शिपिंग कंपनीत जागा असल्याचे सांगत या दोघांशी संपर्क केला. वर्मा याने परदेशात नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन दोघांकडून प्रत्येकी 3 लाख रुपये प्रमाणे 6 लाख रुपये घेतले. त्यानंतर वर्मा दोघांनाही मलेशिया येथे घेऊन गेला. मात्र, मलेशिया येथून वर्मा बेपत्ता झाला. पाटील आणि अहिरराव यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी घरी परतून पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. एलसीबीचे निरीक्षक प्रभाकर रायते, दुर्गेश तिवारी, उत्तमसिंग पाटील, मुरलीधर आमोदकर, ईश्वर सोनवणे, रवींद्र चौधरी यांच्या पथकाने वर्मा याला उत्तर प्रदेशातून अटक केली. त्याला पारोळा पोलिसांच्या ताब्यात दिले.