आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पथनाट्यात न्यायाधीशांनीही साकारली भूमिका, लोकअदालतीचे महत्त्व विषद करणारे नाट्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या लोकअदालीच्या प्रसारासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे शुक्रवारी न्यायालय परिसरात लोकअदालतीचे महत्व सांगणारे पथनाट्य वकिलांनी सादर केले. त्यामध्ये न्यायाधीश के.एच.ठोंबरे यांनीही न्यायाधीशाची भूमिका साकारून सहभाग घेतला. 
 
पथनाट्यात अॅड.राहुल अकुलकर, अॅड.प्रवीण पांडे, अॅड.रत्ना चौधरी, अॅड.अमृता भावे, अॅड.प्रवीण शिंदे, अॅड.योगेश पाटील यांनी विविध प्रसंग साकारले. विशेष म्हणजे विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश के.एच.ठोंबरे यांनी देखील भूमिका साकारून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. सर्वांना वाटले न्यायाधीश पथनाट्याबाबत मार्गदर्शन करतील. त्यांनी या पथनाट्यात भूमिका साकारल्याने सर्वांनी कुतुहल व्यक्त केले. त्यांनी भूमिका साकारून उपस्थितांना लोक अदालतीचे महत्व आयोजनाविषयी माहिती दिली. सबळ वादन बंडू दलाल यांनी केले. या प्रसंगी न्यायाधीश, वकील बांधव तसेच जळगाव जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड.आर.आर.महाजन, उपाध्यक्ष अॅड.मिलिंद बडगुजर, सचिव अॅड.अनिल पाटील यांच्यासह पक्षकारांची उपस्थिती होती. पथनाट्य प्रयोगाचे आयोजन जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने करण्यात आले. न्यायाधीश अग्रवाल यांच्या हस्ते पथनाट्यातील सहभागी कलावंतांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ठोंबरे यांनी सूत्रसंचालन केले. 
 

विनोदाच्या माध्यमातून खुसखुशीत भाष्य 
वाढत्या खटल्यांमुळे न्यायव्यवस्थेवर ताण वाढत आहे. या ताणामुळे राजा अस्वस्थ होतो. राज्याचा दौरा करतो आणि उपाय म्हणून लोकअदालत का कशासाठी हे समजावून घेतो, असे पथनाट्याचे सूत्र आहे. या पथनाट्यात लोक अदालतीचे महत्व छोट्या छोट्या प्रसंगातून काही प्रसंगी विनोदाच्या माध्यमातून दर्शवण्यात आले.पती, पत्नीमध्ये होणारे वाद, वाढत जाणारे धनादेश अनादराचे खटले अशा वाढत चाललेल्या खटल्यांची संख्या यावर पथनाट्यामध्ये खुसखुशीत भाष्य करण्यात आले. त्यास उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली. 
बातम्या आणखी आहेत...