आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन गटांतील वादामुळे ज्योतिषाचे संशोधन रखडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ‘ब्रह्मांडातील चार ते साडेचार टक्के गोष्टीच ज्ञात असून उर्वरित गूढ अजूनही कायम आहे. शास्त्रज्ञ त्याच्या शोधात अविरत प्रयत्नशील आहेत. ज्योतिषशास्त्राचा उपयोग हवामान आणि शेती कामाशीदेखील निगडीत आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यापीठामध्ये त्याचे अभ्यासक्रम सुरू व्हावेत आणि त्या माध्यमातून संशोधनाचे काम हाती घेतले जावे. मात्र ज्योतिषशास्त्राला मानणारा व न मानणारा अशा दोन गट निर्माण झाल्यामुळे या क्षेत्रातील संशोधनाचे काम रखडले आहे,’ अशी खंत महाराष्ट्र राज्य ज्योतिष परिषदेचे राज्य अध्यक्ष ना.रा. बुटले यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली.

एकीकडे ज्योतिषशास्त्राचे महत्त्व वाढत आहे. पूर्वी ठरावीक घराण्यात शास्त्र परंपरागत चालायचे. आता तर जाती-भेद विरहित ज्ञान मिळायला लागले आहे. तसेच आत्मविश्वास वाढवण्याचे काम ज्योतिषशास्त्र शिकवते. ज्योतिषशास्त्राची आचारसंहिता पाळणे तितकेच महत्त्वाचे आहे. अभ्यासाने मिळवलेल्या ज्ञानातून एखाद्या याचकाला त्याच्या संकटातून बाहेर काढणे खूप मोठे काम आहे. त्यामुळे संबंधित व्यक्ती समोर आल्याशिवाय कुठलेही भविष्य वर्तवू नये, असा सल्लाही बुटलेंनी दिला.

खड्यांचे ज्ञान कमीच
राशीनुसार खड्यांना महत्त्व आहे; परंतु, कुठल्या ग्रहासाठी कोणते खडे वापरायचे आणि ते खडे किती प्रभावशाली आहेत, याविषयीचे ज्ञानदेखील अभ्यासकांना नसते. पोटाच्या चिंतेमुळे ज्योतिषशास्त्राला वेगळे वळण दिले जात आहे, अशी खंतही बुटलेंनी व्यक्त केली.

जाहिरातींमुळे बदनामी
जाहिरातीच्या माध्यमातून हनुमान कवच आणि रत्नांच्या माध्यमातून व्यवसाय सुरू झाला आहे. यातून ज्योतिषशास्त्र बदनाम होत आहे. ज्योतिषांनी प्रामाणिक राहून येणार्‍या व्यक्तीचे समाधान करायला हवे. कालसर्पाची शांती, मंगळदोष असे सांगून काही मंडळींनी व्यवसाय थाटला आहे. तो बंद झाला पाहिजे, अशी अपेक्षा बुटलेंनी व्यक्त केली.