आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवानिमित्त राज्यपालांच्या हस्ते विविध उद्घाटने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वर्धापनदिनानिमित्त गुरुवारी नंदुरबार येथील जी.टी.पी कला, वाणिज्य महाविद्यालयला उत्कृष्ट महाविद्यालयाने गौरवण्यात आले. याचवेळी उत्कृष्ट प्राचार्य, प्राध्यापक आणि उमवितील कर्मचा-यांचा राज्यपाल के. शंकरनारायण यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

शासकीय प्रोटोकॉलनुसार तीन तासांत पाच कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. त्यात रौप्य महोत्सव वाटिकेचे उद्घाटन, डिजिटल नॉलेज सेंटरचे उद्घाटन, कर्मचारी भवनाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. याचवेळी प्राध्यापकांशी चर्चा आणि सांस्कृतिक कार्यक्रमही झाले. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे, कुलगुरू प्रा.डॉ.सुधीर मेश्राम, विभागीय आयुक्त एकनाथ डवले हे उपस्थित होते. कार्यगौरव पुरस्कार वितरण समारंभाआधी विविध कामांचे उद्घाटन राज्यपालांनी केले. कुलगुरू प्रा. डॉ. सुधीर मेश्राम यांनी प्रास्ताविकात विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा मांडला. डॉ. प्रीती अगरवाल यांनी सूत्रसंचालन तर कुलसचिव ए.एम.महाजन यांनी आभार मानले.

कर्मचा-यांचा गौरव
नंदुरबार येथील जी.टी.पी कला, वाणिज्य महाविद्यालयाला गौरवण्यात आले. उत्कृष्ट प्राचार्य, प्राध्यापक आणि उमवितील कर्मचा-यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सांस्कृतिक कार्यक्रम
संगीत विभागातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. केंद्रीय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी योगा डान्स सादर केला. तसेच समूह गायन, नृत्य सादर केले.
प्राध्यापकांशी चर्चा राज्यपाल यांनी अतिथीगृहात प्रशाळांचे संचालक, विभागप्रमुख, प्राध्यापकांशी संवाद साधला. सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.,

शासकीय ताफा दिमतीला
राज्यपालांच्या उपस्थितीमुळे शासकीय ताफा त्यांच्या दिमतीला होता. विमानतळावर आगमनापासून ते कार्यक्रमस्थळी अधिकारी त्यांच्यासोबत होते. जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले, आयुक्त संजय कापडणीस व इतर अधिकारी उपस्थित होते.

सफाई कामगारांनी मांडली व्यथा
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात गेल्या काही वर्षांपासून कंत्राटी सफाई कामगार म्हणून काम करणा-या कामगारांना बेकायदेशीरपणे कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ उमवि कंत्राटी कामगार संघटनेने राज्यपालांना निवेदन दिले. विजय पवार, परशुराम गावडे, संगीता गाडे आदींनी राज्यपालांची भेट घेतली.
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांचे नृत्य
विद्यापीठाच्या संगीत विभागातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. योगाचे प्रात्यक्षिके उत्कृष्ट पद्धतीने सादर केले. त्यांचे राज्यपालांनी कौतुकही केले. त्यानंतर रागिणी बोदडे, युगश्री महाले, प्रा. संजय पत्की यांनी गीत सादर केले. अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नृत्य केले. लक्ष नृत्याने उपस्थित अक्षरश: भारावून गेले होते. सगळ्यांनी स्तुती केली.