आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काबरा यांच्या वीजमीटरमध्ये रेझिस्टन्सचा वापर : क्रॉम्प्टन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - वीजमीटरमध्येरेझिस्टंटचा वापर करून मीटर संथगतीने चालवण्याचा प्रताप विद्यानगरातील ग्राहक वंदना सतीश काबरा यांनी एका खासगी लाइनमनच्या मदतीने केला हाेता. हा प्रकार अाता पंचनाम्यात उघडकीस अाला अाहे. त्यामुळे संबंधित ग्राहकावर वीज अधिनियम कायदा १३५ १३८नुसार नाशिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती क्रॉम्प्टनचे युिनट हेड भवानीप्रसाद राव यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.
वीज ग्राहक वंदना काबरा यांनी खासगी लाइनमन प्रमोद भोळेकडून वीजमीटरमध्ये रेझिस्टंट टाकल्याने वीजमीटर संथगतीने चालत होते. चार रूमच्या घरात ए.सी अन्य विविध उपकरणे असताना रीडिंगच कमी झाल्याने बिले कमी येत होते. काबरा यांनी आमच्या कंपनीचे नाव सांगून फसवणूक करणाऱ्या तोतयास पकडून िदले आहे, त्यांचे हे काम गौरवास्पद आहे. त्याबाबत तोतया लाइनमनवर कंपनीने गुन्हा दाखलदेखील केला आहे. मात्र, या आधी वीजमीटरमध्ये रेझिस्टंट कसे टाकले गेले हाेते, ते आता पंचनाम्यात उघड झाले आहे. तो पंचनामा आम्ही पोलिसांकडे सादर केला अाहे. संबंधित ग्राहकांनी हा प्रकार वेगळ्या पद्धतीने मांडला आहे. जर मीटरमध्ये तुम्ही फेरफार केली नाही, तर तोतया भोळेस भेटण्यास ग्राहक का गेले? हा प्रश्नही क्रॉम्प्टन कंपनीने उपस्थित केला आहे.
मीटरच्या पंचनाम्या वेळी मीटरचे सील तुटलेल्या स्थितीत होते. यामुळे त्यात स्वतच्या फायद्यासाठी रेझिस्टंट टाकून मीटर संथ केले गेले होते. मात्र, त्यानंतर तोतया लाइनमन तक्रारदार यांच्यातील व्यवहार फिस्कटल्याने त्यांनी हा प्रकार वेगळ्या पद्धतीने समोर आणला. त्याअाधीच काबरा यांनी ही माहिती क्रॉम्प्टन अथवा पोलिसांना देणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी ते टाळले. पाहणीनंतर जुने मीटर काढून ग्राहकास नवीन मीटर दिले आहे. जुने मीटर पोलिसांकडेदिले आहे. भोळेच्या जबाबावरून आता खरे सत्य बाहेर पडणारच असल्याचेही क्रॉम्प्टनच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.