आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kahnsedh Vikas Aghadi Back Out Issue In Jalgaon Corporation

सत्ता साेडण्यावरून ‘खाविअा’चे घूमजाव, मैदान साेडून पळपुटेपणा करणार नाही : रमेश जैन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मनपात सुरू असलेला कारभार पाहता खरंच सत्ता साेडून विराेधात बसण्याचा विचार येताे. परंतु साडेचार लाख जनतेने विश्वास टाकला अाहे. जेवढे भांडून मिळवता येईल तेवढा प्रयत्न करणार. त्यामुळे मैदान साेडून पळपुटेपणा करणार नसल्याचे मत खाविअाचे नेते रमेश जैन यांनी व्यक्त केले. एकंदरीत महापाैर उपमहापाैरांच्या राजीनाम्याच्या वृत्तावरून खािवअाने अाता घूमजाव केले अाहे.
रमेश जैन यांनी महासभेनंतर प्रशासनाबद्दलची उघड नाराजी व्यक्त केली. निवडणुकीच्या अाधीच्या वर्कअाॅर्डरचे काम अातापर्यंत हाेतेय. ते हाेऊ दिले नाही, त्याचेही कारण वेगळे अाहे. पालिकेतील अधिकारी एकप्रकारे सुपारी घेऊनच अालेले दिसताय, असा टाेमणाही त्यांनी मारला. संजय कापडणीस यांची जळगाव अायुक्तपदी कशी नियुक्ती झाली याचे पुरावेही अापल्या जवळ असल्याचे पहिल्यांदाच जैन यांनी सांगितले.
अातापर्यंत सभागृहात प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मी एकटाच बाेलत हाेताे. अाता सर्वच बाेलायला लागले. सभागृहावर करण्यात अालेल्या अाराेपांचे पत्रदेखील नगररचना सहायक संचालक चंद्रकांत निकम यांनीच तयार केल्याचा दावाही त्यांनी केला. एकंदर प्रशासन कटपुतलीचा खेळ करीत अाहे. परंतु यातून करमणूक कमी अाणि जनतेचा जीव अधिक जात आहे. रचना सहायकावर अाजच कारवाई करू शकलाे असताे,असेही जैन यांनी सांगितले.