आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलादर्श पुरस्काराने विविध क्षेत्रातील २३ जणांचा गाैरव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कलादर्श फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन चौघुले, याेगेश शुक्ल यांच्यासह पुरस्करार्थी.)
जळगाव-कलादर्श फाउंडेशनतर्फे शहरात प्रथमच गुरुवारी विविध कला क्षेत्रातील २३ व्यक्तींचा ‘कलादर्श पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. कांताई सभागृहात कार्यक्रम झाला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध फॅन्ड्री चित्रपटाचे मुख्य कॅमेरामन विक्रम अमलाडी, नीक चॅनलचे प्रोमो हेड गिरीश जोशी, फॅशन डिझाइनर चैत्राली डोंगरे, जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अशोक जैन, फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन चाैघुले, उपाध्यक्ष अभय सोनवणे उपस्थित होते.
पुरस्कार वितरणादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम झाला. कार्यक्रमासाठी भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन चॅरिटेबल ट्रस्टचे सहकार्य मिळाले. योगेश शुक्ल, श्रद्धा शुक्ल यांनी सूत्रसंचालन केले. सचिन चौघुले यांनी आभार मानले.

यांचाझाला सन्मान
शिरीषबर्वे (आर्किटेक्चर), संगीता पाटील (फॅशन), सपना काबरा (इंटेरियर), जगदीश शर्मा (ज्वेलरी), रमाकांत सूर्यवंशी (मेटल मूर्तिकार), हेमंत कुळकर्णी, शमा सराफ, चिंतामण पाटील, रमेश भोळे (नाटक), संजय पत्की, संगीता म्हसकर (संगीत), आनंद मल्हारा (प्रिंटिंग), विनोद ढगे (लोककला), अपर्णा भट, महिमा मिश्रा (नृत्य), नितीन थोरात (छायाचित्रकार), राजू बाविस्कर (चित्रकार), रईस काझी (म्युरल), मिलन भामरे (बुक जॅकेट), सचिन मुसळे, राजू बाविस्कर (चित्रकार),बंडू खडके (पितळी नक्षीकाम), प्रा. बी.एन.चौधरी(कवी) यांचा गौरव झाला.
शास्त्रीय आणि पाश्चात्त्य संगीताचा मेळ साधत फ्युजन सादर
याप्रसंगीस्वर ओंकार ग्रुपतर्फे शास्त्रीय आणि पाश्चात्त्य संगीताचा मेळ साधत फ्युजन हा संगीत प्रकार सादर झाला. कार्यक्रमाची सुरुवात "गणेशाय धिमही' या गाण्याने झाली. त्यानंतर काही पुरस्कारांचे वितरण झाले. नंतर मला "वेड लागले प्रेमाचे..., मन उधाण वाऱ्याचे..., आभास हा..., ये गो ये मैना...' यासारख्या मराठी गाण्यांची मेजवानी उपस्थितांनी अनुभवली. यामध्ये निहार पत्की, प्रथमा पाठक, खुशबू सुराणा, गौरव काईतवाडे, सागर दशपुत्रे, युवराज सोनवणे यांचा समावेश होता.

सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य सादर करताना विद्यार्थी.
पुरस्कार वितरण प्रसंगी उपस्थित जैन उद्योग समूहाचे उपाध्यक्ष अशोक जैन, आनंद गुप्ते, फॅण्ड्री चित्रपटाचे डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी विक्रम अलमाडी, निक चॅनेलचे प्रोमो हेड गिरीश जोशी, एलिझाबेथ एकादशी चित्रपटाची वेशभूषा करणाऱ्या चैत्राली डोंगरे, कलादर्श फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन चौघुले, याेगेश शुक्ल यांच्यासह पुरस्करार्थी.