आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीने हुज्जत घातल्याने गहिवरल्या शिक्षिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - येथील कनोसा काॅन्व्हेंट शाळेत नर्सरी प्रवेशाच्या मुद्द्यावरून महापाैर, स्थायी समिती सभापती, नगरसेवक विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शाळा व्यवस्थापनाला घेराव घातला. या वेळी जाेरदार वादावादी झाली. या वेळी शिक्षिकांनाच काळे फासण्याच्या प्रयत्नाचा मुद्दा तापला. त्यामुळे शिक्षिका गहिवरल्या. अाम्ही कुटुंबे साेडून केवळ शिकवण्यासाठी धुळ्यात अाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
शनिवारी महापौर जयश्री अहिरराव, स्थायी समिती सभापती सोनल शिंदे, महिला बालकल्याण सभापती कल्पना बोरसे, नगरसेवक मनोज मोरे यांनी चाळीसगाव रोडवरील कनोसा शाळा गाठली. मात्र, व्यवस्थापन मालेगाव रोडवरील शाळेत असल्याचे पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले. अखेर पदाधिकाऱ्यांनी मालेगाव रोडवरील कनोसा बालमंिदर अर्थात सेंट झेव्हियर्स स्कूल गाठली. या वेळी व्यवस्थापक महिलेने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना शाळेच्या अावारात प्रवेश नाकारला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. आंदोलनाची तीव्रता वाढवली. त्यानंतरही केवळ महापौर यश कदमबांडे यांनाच प्रवेश देत इतरांनी बाहेर थांबावे, असे सांगितले. त्यामुळे आंदोलकांचा पारा अधिकच चढला. सुरुवातीपासूनच संतप्त असलेल्या राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी असंवेदनशीलतेचे दर्शन घडवत कनोसा कॉन्व्हेंटच्या महिला पदाधिकारी कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. या वेळी काहींनी तर चक्क महिला मुख्याध्यापिका, महिला व्यवस्थापिका यांना काळे फासण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे काहीसे वातावरण तंग झाले. कार्यकर्त्यांनी शाळा व्यवस्थापकांच्या दालनाला चक्क आखाड्याचेच स्वरूप दिले. दरम्यान शिक्षक, मुख्याध्यापकांना काळे फासण्यासारखी दुर्दैवी घटना घडू नये म्हणून काही पालक, शिक्षक पोलिसांनी मध्यस्थी केली.

प्रवेश पद्धत चुकीची
^सेंट झेव्हियर्स तसेच कनोसामधील प्रवेश पद्धत चुकीची आहे. सहा महिन्यांसाठी बालकांचे वय कमी करण्याचा प्रयत्न शाळेने चालवला आहे. ही बाब अयोग्य आहे. सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळायला हवा. त्याशिवाय शिक्षणात समान हक्क मिळणार नाही. जयश्रीअहिरराव, महापौर