आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कानुबाईच्या गीतांतून खान्देशी परंपरेचे दर्शन, बाेलीभाषेतील पारंपरिक गीतांद्वारे संस्कृतीला उजाळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संस्कारभारतीच्या लाेकसंगीत विभागातर्फे रविवारी सादर करण्यात अालेल्या कानुबाईच्या गीतांनी खान्देशच्या परंपरेला उजाळा देण्यात अाला. अहिराणी बाेलीभाषेतील पारंपारीक गीतांद्वारे खान्देशच्या संस्कृतीचे यावेळी दर्शन करण्यात अाले.

या वेळी सुनंदा चाैधरी, सुचिता साळुंखे, अनिता साेनवणे यांनी कानुबाईंच्या गीतांचे सादरीकरण केले. यात 'झुळ झुळ वाहे पुण्य जळाचा निर्झर हाे' या श्री गणेशाच्या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर 'कानुबाई वं माय', 'माय तुले उनू भेटाले उनू दर्सनले', 'सप्तश्रृंगी अाई माझी पावली कुणाला' यासारख्या अहिराणी गीतांची मेजवानी रसिकांना मिळाली. यासह मराठी गीतांचेही बहारदार पणे सादरीकरण करण्यात अाले. त्यांना भगवान चव्हाण यांनी ढाेलकिवर, संवादिनीवर दिलीप चाैधरी, टाळ माधव पारगावकर यांनी साथसंगत केली. जयनगरमधील राकेश शिरसाठ यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

अनेक ठिकाणी कानुबाईचा उत्सव साजरा
रविवारीखान्देशात अनेक ठिकाणी कानुबाईचा उत्सव साजरा करण्यात अाला. खान्देशातील कानुबाईची माेठी परंपरा असून यानिमित्तानेच या कार्यक्रमाचे अायाेजन करण्यात अाले हाेते. या वेळी संस्कार भारतीच्या पदाधिकारी परिसरातील नागरिकांची माेठ्या प्रमाणावर उपस्थिती हाेती.

संस्कार भारतीच्या लाेकसंगीत विभागातर्फे जयनगर येथे राकेश शिरसाठ यांच्या निवासस्थानी कानुबाईचे गीत सादर करताना सुनंदा चाैधरी, सुचीता साळुंखे, अतिना साेनवणे गीतावर फुगडी खेळताना महिला सहकारी.
बातम्या आणखी आहेत...