आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा जणींनी कन्यादान करून घडवले ‘सात फेरे’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - दोघांचा पहिल्या संसाराचा काडीमाेड झालेला होता. त्यामुळे तारुण्यातच नशिबी निराशा आल्याने ते एकाकी आयुष्य जगत हाेते. मात्र, महिला दक्षता समितीने या घटस्फोटी तरुण-तरुणीचा पुनर्विवाह घडवून आणला. विशेष म्हणजे या विवाहासाठी महिला समितीच्या सहा सदस्यांनी पारंपारिकतेला छेद देत कन्यादान करत नवा आदर्श निमार्ण केला.पद्मालय येथील गणपती मंदिरात शनिवारी हा विवाह साेहळा पार पडला.
जळगाव शहरात राहणाऱ्या या नवदांपत्याचे नाव मनीषा आणि विनोद पाटील असे आहे. मनीषा २५, तर विनोद ३० वर्षांचा आहे. मनीषाचा दोन व विनोदचा वर्षभरापूर्वीच घटस्फोट झाला होता. आयुष्याची सुरुवात करीत असतानाच दोघांच्या नशिबात घटस्फोटाचे वादळ आले होते. त्यानंतर दु:खाचा डोंगर छातीवर घेत दोघांच्या नशिबी एकाकी आयुष्य आले होते. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. साधारणपणे वर्षभरापूर्वी हे दोघे एकमेकांच्या संपर्कात आले. दोघेही घटस्फोिटत असल्यामुळे त्यांचे विचार आणि मने जुळून आली. त्यामुळे पूर्वीच्या कटू आठवणी बाजूला सारत दोघांनी एकमेकांसोबत संसार थाटण्याचे ठरवले. मात्र, दोघांच्याही कुटुंबीयांना ते मान्य नव्हते. अखेर दोघांनी महिला व बाल साह्य कक्ष आणि महिला दक्षता समितीच्या मदतीने शनिवारी पद्मालय येथे सात फेरे घेऊन नव्याने संसाराला सुरुवात केली.
कुटुंबीयांचा विरोध
दुसऱ्या लग्नाविषयी दोघांनी घरी सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी विरोध केल्याने दोघेही खचले होते. त्यामुळे त्यांनी महिला व बाल साह्य कक्षात पत्र पाठवून मदतीची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानुसार शनिवारी महिलांनी एकत्र येऊन दोघांचा विवाह लावून दिला. तसेच रात्री ८.३० वाजता त्यांच्या विवाहासंदर्भातील माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली.
महिला सदस्य बनल्या पालक
पद्मालय येथे वैदिक पद्धतीने हा विवाह झाला. त्यामुळे कन्यादानही करण्यात आले. कन्यादानासाठी एकही दांपत्य उपलब्ध न झाल्यामुळे महिला व बाल साह्य कक्षाच्या वदि्या सोनार, शोभा हंडोरे आिण महिला दक्षता समितीच्या स्मिता वेद, नविेदिता ताठे, वैशाली विसपुते व सरिता माळी या सहा महिलांनी कन्यादान केले. तसेच धरणगाव पंचायत समितीचे सभापती राजू माळी यांनीही विवाहस्थळी उपस्थित राहून मदत केली.