आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरूणाईच्या जोशात रथोत्सव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- ‘दाहीसरिता वहनं, आली एकादशी मोठी... मंग सावरला रथ, झाली गावामंधी दाटी...’ अशा सार्थ शब्दांत बहिणाबाईंनी आपल्या गीतात या रथोत्सवाचे वर्णन केले आहे. गेल्या काही वर्षांत रथोत्सवात सहभागी होणाऱ्या भाविकांमध्ये युवकांचा सहभाग वाढला आहे. गणेशोत्सव दुर्गात्सवानंतर या रथोत्सवात तरुणाई उत्साहाने समरस होत आहे. कित्येक वर्षांपासून रथ ओढणारे सेवेकरी मोगरी लावणारे यांच्यात बदल होऊन आता गेल्या 10 वर्षांपासून त्यांची जागा नव्या दमाच्या युवकांनी घेतली आहे. रथाच्या फेरीत मुख्य कार्य रथ ओढण्याचे असून, त्यात सुमारे 80 टक्के युवकांचा सहभाग असताे.
देशातील एकमेव कार्तिक रथोत्सव
जिल्ह्यातवर्षभरात रावेर, यावल, पारोळा, धरणगाव, फैजपूर शेंदुर्णी येथील रथोत्सवाचे आयोजन केले जाते. त्यातील जळगावचा रथाेत्सव संपूर्ण देशभरात कार्तिकी एकादशीला साजरा होणारा एकमेव रथोत्सव आहे. जळगाव जिल्हा हा रथांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात 17 ठिकाणी रथ निघतात. या दिवशी रथ काढण्याला धर्मशास्त्राचा आधार आहे.
रथाची सजावट करताना सेवेकरी.
श्रीराम मंदिर संस्थानने सोमवारी श्रीराम रथोत्सवाचे आयोजन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी रथाची रंगरंगोटी करून सजावट करण्यात आली.
देशातील एकमेव कार्तिक रथोत्सव
जिल्ह्यातवर्षभरात रावेर, यावल, पारोळा, धरणगाव, फैजपूर शेंदुर्णी येथील रथाेत्सवाचे आयोजन केले जाते. त्यातील जळगावचा रथोत्सव संपूर्ण देशभरात कार्तिकी एकादशीला साजरा होणारा एकमेव रथोत्सव आहे. जळगाव जिल्हा हा रथांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात 17 ठिकाणी रथ निघतात. या दिवशी रथ काढण्याला धर्मशास्त्राचा आधार आहे.