आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kashi Express Calisagon Engines At Around Sudden Fire Incident

चाळीसगावजवळ काशी एक्‍स्‍प्रेसच्‍या इंजिनला आग; चालकाच्‍या सर्तकतेने टळली दुर्घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आग लागल्‍यानंतर खाली उतरलेले प्रवाशी. - Divya Marathi
आग लागल्‍यानंतर खाली उतरलेले प्रवाशी.
(फोटो - आग लागल्‍यानंतर गाडीखाली उतरलेले प्रवाशी.)
जळगाव – चाळीसगावजवळ काशी एक्स्प्रेसच्या इंजीनला आज (सोमवार) दुपारी 2 वाजातच्‍या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. चालकाच्‍या सर्तकतेमुळे ही आग तत्‍काळ अटोक्‍यात आली. त्‍यामुळे मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव-मुंबई मार्गावर हीरापूर येथे काशी एक्‍स्प्रेसच्या इंजिनला आग लागली. ही बाब चालकाच्या लक्षात आल्यानंतर रेल्वे खडकी बायपासवर थांबविण्यात आली. इंजिनला आग लागल्याचे समजल्यानंतर प्रवाशांमध्ये दहशत परसरून गोंधळ उडाला. मात्र, चालकाने रेल्वे स्‍थानकाशी संपर्क करून याबाबत माहिती दिली. तत्‍काळ चाळीसगाव नगरपालिकेचे अग्निशामन दल घटनास्थळी दाखल झाले. 35 मिनिटानंतर आग आटोक्‍यात आली. पंख्‍याजवळ झालेल्‍या शॉर्टसक्रिटमुळे ही आग लागल्‍याचा प्राथमिक अंदाज व्‍यक्‍त केला जात आहे. यामुळे तब्‍बल दोन तास गाडी एकाच ठिकाणी थांबून होती. त्‍यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.
पुढील स्‍लाइडवर पाहा घटनेनंतर प्रवाशांची उडालेली तारांबळ.