आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षेत यशासाठी सातत्य, संयम ठेवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- स्पर्धा परीक्षांसाठी कठोर परिश्रम, अभ्यासाचे सातत्य आणि गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनाबरोबरच संयम ठेवणे गरजेचे असते, असे प्रतिपादन दीपस्तंभचे संचालक लेखक जयदीप पाटील यांनी केले. दीपस्तंभतर्फे कृषक भवनात शनिवारी तलाठी आणि लिपिक परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते.
पाटील म्हणाले, तलाठी हे महसूल प्रशासनातील अत्यंत महत्त्वाचे पद असून त्याद्वारे लोकांची सेवा तुमच्याद्वारे घडत असते. या पदासाठी इंग्रजी, मराठी, गणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि सामान्य अध्ययन हे विषय महत्त्वाचे आहे. या विषयाच्या अभ्यासाचे योग्यप्रकारे नियोजन करून सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास यश नक्की मिळते. त्यामुळे हार मानता, नकारात्मक भावना ठेवता प्रयत्न करीत राहा. परीक्षेची तयारी करताना सखोल अभ्यास, कमी वेळात अचूक उत्तर शोधण्याचे तंत्र गरजेचे असते.

सर्वच स्पर्धा परीक्षांची काठिण्य पातळी गेल्या वर्षांपासून उंचावली असल्याने प्रत्येक विषयासाठी संदर्भग्रंथांचा वापर वाढवण्याची गरज आहे. महाराष्ट्र शासनाने काही विभागातील नोकरभरती स्थगित केली असली तरी महत्त्वाच्या पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार आहेत. या प्रसंगी सविता भोळे, पी.डी.गावंडे, विशाल पाटील, दीपक पाटील, सय्यद कलीम उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्याचे वैयक्तिक समुपदेशन करण्यात आले.
सखोल अभ्यासाची गरज
स्पर्धा परीक्षांची तयारी करताना अभ्यासक्रम कठीण नसतो, पण अभ्यासाची व्यापकता जास्त असते. या परीक्षांची तयारी करताना मूलभूत ज्ञानासह एकूण सखोल अभ्यासाची गरज असते. तसेच समाजातील सर्वच क्षेत्रातील घटनांवर प्रश्नांचे प्रमाण वाढत असल्याने नियमित वृत्तपत्र वाचन करून त्यातील टिपणे काढणे आवश्यक आहे. गणित बुद्धिमापन चाचणी हे विषय सरावाचे असल्यामुळे रोज किमान दोन तास सराव करावा, असेही त्यांनी सांगितले.