आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kerala, Andhra Regional Mango Enter In Dhule Market, Divya Marathi

केरळ, आंध्र प्रदेशातून धुळ्यात आंबा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे यंदा राज्यातील आंब्याचे आगमन उशिरा होणार आहे. मात्र, दुसरीकडे केरळ, आंध्र प्रदेशातील आंबे बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. आवक कमी असल्याने दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत.
येथील बाजारपेठेत दरवर्षी अक्षयतृतीयेपासून आंब्यांची मोठय़ा प्रमाणावर आवक होते. राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने त्याचा परिणाम आंब्याच्या उत्पादनावर झाला आहे. त्यामुळे यंदा राज्यातील विविध भागातून होणारी आंब्याची आवक उशिरा होणार आहे. दुसरीकडे बाजारात चेन्नई, केरळ, आंध्र प्रदेशातील आंब्याची आवक सुरू झाली आहे. बाजारात लालबाग आंब्याची 100 ते 140 रुपये, हैदराबादी केसर 120 ते 160 रुपये, बदाम 120 ते 160 रुपये किलोप्रमाणे तर रत्नागिरी हापूसची 800 ते 1200 रुपये डझनने विक्री होत आहे. गत वर्षाच्या तुलनेत यंदा आंब्याचे दर किलोमागे 20 ते 40 रुपयांनी वाढले आहेत. सामान्य नागरिकांना त्याचा फटका बसणार आहे. यंदा आंब्याची चव कमी प्रमाणावर चाखता येणार आहे.
राज्यांतर्गत आंबा उशिराने
दशहरा, लंगडा, केशर, राजापुरी आदी राज्यात उत्पादित होणार्‍या आंब्याची यंदा उशिरा आवक होणार आहे. साधारण अक्षयतृतीयेच्या सुमारास ती होईल. जोपर्यंत आवक वाढत नाही तोपर्यंत दर कमी होणार नाहीत, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली. दरम्यान यंदा पावसामुळे आंब्याच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.