आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: ‘केतकी’च्या सुरक्षेची हेळसांड; पोलिस महासंचालकांकडे तक्रार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- बहिणाबाई महोत्सवाच्या उद््घाटनाला अालेल्या ‘टाइमपास’ फेम केतकी माटेगावकर या मराठी अभिनेत्रीला महोत्सवात कोणत्याही प्रकारची सुरक्षा देण्यात अाली नाही, अशी तक्रार तिचे वडील पराग माटेगावकर यांनी राज्याचे पाेलिस महासंचालक सतीश माथूर यांच्याकडे केली अाहे. दरम्यान, सुरक्षेची संपूर्ण व्यवस्था केली हाेती. मात्र, केतकी अर्ध्या कार्यक्रमातून गेल्याने हा गाेंधळ उडाल्याचा दावा अायाेजकांनी केला. 

अभिनेत्री केतकी हिचे वडील पराग माटेगावकर यांनी पाेलिस महासंचालकांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले अाहे की, केतकी प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री आहे. तिला जळगावला बहिणाबाई महोत्सवाच्या उद््घाटनाकरिता ११ फेब्रुवारी रोजी सेलिब्रिटी म्हणून आमंत्रित केले होते. दीपक परदेशी हे आयोजक होते. या वेळी केतकी भोवती प्रचंड गर्दी झाली; पण आयोजकांनी सुरक्षेची कोणतीही व्यवस्था केली नव्हती. पोलिस, बाउन्सर्स किंवा साधा गार्डही नव्हता. मुलगी म्हणून त्यांनी ती व्यवस्था बघायला हवी होती. प्रचंड जनसमुदाय असल्यामुळे तिला तेथून बाहेर पडता येत नव्हते. आयोजकही काही प्रयत्न करत नव्हते. उलट कार्यक्रमासाठी थांबावयास सांगत होते. हे सर्व बघून तेथील स्थानिक महिलांनी एक साखळी करून तिला गाडीपर्यंत पोहोचवले. 

कुठल्याही महिला कलाकाराकरिता हे खूप त्रासदायक आहे. सुदैवाने वडील म्हणून मी तिथे होतो म्हणून हवी ती काळजी घेऊ शकलो. तिथे काही स्थानिक व्यक्तींनी आणि महिलांनी ज्यांचा आयोजनाशी संबंध नव्हता त्यांनी वेळेवर मदत केल्यामुळे काही अनुचित प्रकार घडला नाही. पण यापुढे महिला कलाकारांना आमंत्रित केल्यावर काळजी घेण्यात यावी, ही अपेक्षा आहे. त्या दिवशी बाहेर जाण्याकरिता मार्ग मुद्दामच ठेवला नाही. कारण कुठलीही सेलिब्रिटी कार्यक्रमामधून निघून गेली की लोकही थांबत नाही. पण असा प्रसंग भविष्यात पुन्हा घडू नये, या हेतूनेच मी आपल्याला हे कळवतो आहे. कृपया योग्य ती कारवाई करावी ही विनंती, असे या पत्रात माटेगावकर यांनी म्हटले अाहे. 

कार्यक्रम अर्ध्यातून साेडून जाण्याच्या प्रयत्नाने गाेंधळ 
अभिनेत्रीच्यासुरक्षेचीसंपूर्ण व्यवस्था करण्यात अाली हाेती. मात्र, त्यांनी कार्यक्रम अर्ध्यातून साेडून जाण्याचा प्रयत्न केल्याने हा गाेंधळ झाला. अामच्या स्वयंसेविकांनी मानवी साखळी करून त्यांना काेणताही त्रास हाेऊ देता मार्ग करून दिला. दीपकपरदेशी, अायाेजक, बहिणाबाई महाेत्सव 
बातम्या आणखी आहेत...