आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केटामाइनप्रकरणी आणखी एकास अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - केंद्रीय महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाने गुरुवारी शहरातील झोपे नामक एका केमिस्टला ताब्यात घेतले. त्याला गुरुवारीच न्यायाधीश व्ही.एस.पाटील यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याला एका दिवसाची कोठडी सुनावण्यात आली.

या प्रकरणात डीआरआयने 14 डिसेंबर रोजी जळगावातून 118 कोटी रुपयांचे केटामाइन जप्त केले होते. याप्रकरणी 15 डिसेंबर रोजी मुंबई येथून विकास सोमनाथ पुरी व जी. र्शीनिवास राव या दोन संशयितांना अटक झाली होती; तर गुरुवारी (दि.26) झोपेला जळगावातून अटक करण्यात आली. शुक्रवारी पुरी, राव आणि झोपे या तिघांनाही न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तिघांच्या कोठडीची मुदत शुक्रवारी संपणार आहे.

झोपे केमिस्ट असल्याची माहिती
गुरुवारी अटक करण्यात आलेला झोपे हा जळगावात केमिस्ट आहे. जळगावात मोठय़ा प्रमाणावर केटामाइन तयार होत असल्याचे डीआरआयच्या कारवाईतून उघड झाले आहे. आता केमिस्टचा सहभाग समोर आल्यामुळे केवळ उत्पादनच नव्हे तर विक्रीही शहरात होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, झोपे याचे पूर्ण नाव आणि दुकानाचा पत्ता मिळवण्यासाठी डीआरआयच्या अधिकार्‍यांशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.