आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केटामाइन प्रकरणात मुंबईत नितीन चिंचोले यास अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - केटामाइन प्रकरणात शनिवारी मुख्य संशयित नितीन चिंचोले यास मुंबईत अटक करण्यात आल्याची माहिती मुंबईतील अधिकृत सूत्रांनी दिली आहे. चिंचोले याच्यासह धारावी भागातील आणखी एका संशयिताला केंद्रीय महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाने ताब्यात घेतले आहे.

14 डिसेंबर रोजी डीआरआयच्या पथकाने जळगावात केटामाइन जप्त केले. या वेळी पथकाने एमआयडीसी परिसरातील रुख्मा इंडस्ट्रीजला सील केले होते. ही कंपनी नितीन चिंचोले याच्या नावावर होती. त्यामुळे चिंचोले या प्रकरणातील मुख्य संशयित असल्याचे समोर आले. याचदिवशी डीआरआयच्या पथकाने चिंचोलेच्या आदर्शनगर येथील घरालाही सील केले होते. 14 दिवस डीआरआयच्या पथकाला हुलकावणी देत चिंचोले बेपत्ता होता. अखेर शनिवारी त्याला अटक करण्यात आली. दरम्यान गुरुवारी नितीनचे काका विलास चिंचोले यांनाही अटक केली होती. नितीन चिंचोलेच्या अटकेनंतर केटामाइन प्रकरणातील महत्त्वाच्या बाबी डीआरआयसमोर येणार आहेत. नितीन चिंचोलेला लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.