आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केटामाईन प्रकरण : नितीन चिंचोलेने नाकारला जबाब

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - केटामाइन प्रकरणात मुंबईला डीआरआय पथकासमोर शरण आलेला मुख्य संशयित नितीन चिंचोले व रजनीश ठाकूर या दोघांना रविवारी जळगाव न्यायालयात हजर केले. या दोघांनी शुक्रवारी दिलेला कबुलीजबाब मान्य नसल्याचा अर्ज न्यायालयात देण्यात आला. दोघांना न्यायालयाने 10 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली. या गुन्ह्यात आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली आहे.

केंद्रीय गुप्तचर (महसूल) विभाग व उपायुक्त उत्पादन शुल्क विभागाने 14 डिसेंबरला रुख्मा इंडस्ट्रीज व उमाळा शिवारातील गोडावूनमध्ये टाकलेल्या धाडीत 118 कोटींचे केटामाइन सापडले होते. तेव्हापासून फरार असलेला या गुन्ह्यातील मुख्य संशयित व कंपनीचा मालक नितीन चिंचोले हा त्याचे काका विलास चिंचोले यांच्या अटकेनंतर शुक्रवारी रात्री मुंबईत डीआरआयच्या पथकासमोर शरण आला. तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपी विकास पुरी याच्या व्हीव्हीएस फार्मा स्पेशालिटी या कंपनीतील कर्मचारी रजनीश ठाकूर (रा. हैद्राबाद ) हा देखील मुंबईत शरण आला. दोघांना शनिवारी मुंबई न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर दोघांना घेऊन डीआरआयचे पथक रविवारी पहाटे जळगावात दाखल झाले. सकाळी 10.30 वाजता दोघांना जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आले होते. त्यानंतर सकाळी 11 वाजेच्या सुमारास न्यायाधीश ए.बी.व्होडावडेकर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.

जबाब इच्छेविरुद्ध : डीआरआयसमोर शरण आलेल्या नितीन चिंचोले व रजनीश ठाकूर यांचे मुंबईत क बुलीजबाब घेण्यात आले आहेत. दोघांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांचे वकील प्रकाश पाटील यांनी अर्ज देऊन दोघांचे जबाब हे स्वेच्छेने घेतलेले नसून ते मान्य नसल्याचा अर्ज दिला आहे.

जबाबात काय म्हटले
संशयित नितीन चिंचोलेचा एनडीपीएस कलम 67 प्रमाणे जबाब नोंदवण्यात आला आहे. डीआरआयने न्यायालयात सादर केलेल्या जबाबात म्हटले आहे की, केटामाइन एचसीएल मॅनीफॅरिंग करण्यासाठी विकास पुरी याला फॅक्टरी वापरण्यासाठी दिली होती. त्याबदल्यात मिळणारे पेमेंट हे पुरी किंवा राव देत होता. हा पैसा कच्च माल आणणे, मशिनरीची देखभाल करणे आदी कामांसाठी वापरला. रूख्मा इंडस्ट्रीज व बायोसिंथेझाइनला केटामाइन एचसीएल मॅनीफॅ रिंगचा परवाना नसल्याचे नमूद केले आहे.