आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसे समर्थक संभ्रमात; नेत्यांचा मुंबईत मुक्काम, प्रदेशाध्यक्षांकडे अाज राजीनामे साेपवणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- एकनाथ खडसे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर जिल्ह्यात सुरू झालेले राजीनामानाट्य साेमवारी थांबले. जिल्हा अाणि जळगाव शहरातील विविध पदाधिकाऱ्यांचे पक्षाकडे साेपवलेले राजीनामे घेऊन जिल्हा महानगर अध्यक्षांसह काही पदाधिकारी मंुबईत दाखल झाले अाहेत. मंगळवारी दुपारी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी त्यांच्याकडे राजीनामे साेपवणार अाहेत.

जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी एकनाथ खडसे यांना समर्थन देण्यासाठी त्यांच्या पदाचे राजीनामे पक्षाच्या जिल्हाध्यक्षांकडे साेपवले अाहेत. महानगर अध्यक्ष अामदार सुरेश भाेळे यांनी त्यांच्याकडे अालेले राजीनामे प्रदेशाध्यक्ष दानवे यांची भेट झाल्यामुळे ई-मेलद्वारे पाठवले अाहेत. या राजीनाम्यांवर दानवे निर्णय घेणार अाहेत. दरम्यान, दानवे यांची भेट घेण्यासाठी गेलेले पदाधिकारी मुंबईत मुक्कामाला असून ते बुधवारी खडसेंसाेबत येण्याची शक्यता अाहे.
साेनवणे,अॅड. हाडांच्या भूमिकेने चर्चेला उधाण :खडसे यांच्या समर्थनासाठी जिल्ह्यभरात राजीनाम्याचा पाऊस पडला. जळगाव महापालिकेतील नगरसेवकांनी देखील राजीनामे देत मुंबईत जाऊन खडसेंची भेट घेतली. दरम्यान, अाश्विन साेनवणे अाणि अॅड. शुचिता हाडा या दाेन नगरसेवकांनी राजीनामा दिल्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत राजकारण ढवळून निघाले. राजीनामे देणाऱ्यांपेक्षा देणाऱ्यांची अधिक चर्चा सुरू झाली. जिल्हाभरातील खडसे समर्थकांनी राजीनामा नाट्य सुरू केले असले तरी जामनेरातील महाजन समर्थकांनी "वेट अॅण्ड वाॅच'ची भूमिका घेतली अाहे. पक्षाने खडसेंच्या पाठीशी असल्याचा दावा केल्यामुळे राजीनामे देऊ नये, अशी भूमिका काही भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली अाहे.

राजीनामा नाट्यावर रंगले राजकारण
नगरसेवक,जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत समिती सदस्यांनी काही क्षणात कागदावर स्वाक्षऱ्या करून भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडे राजीनामे सुपुर्द केले अाहेत, असे असताना पक्षाचे खासदार, अामदार, सहकार क्षेत्रातील सक्रिय राजकारणी भाजपच्या संघटनात्मक पदावर असलेल्या पदाधिकाऱ्यांनी मात्र राजीनामे दिलेले नाहीत. त्यामुळे खडसेंसाठी कार्यकर्त्यांचाच बळी द्यायचा का? पदाधिकाऱ्यांनी राजीनामे का दिले नाहीत, अशी चर्चा सुरू झाल्याने भाजपचे अंतर्गत राजकारण ढवळून निघाले अाहे. राष्ट्रवादीने कार्यकर्त्यांएेवजी खासदार, अामदारांनी राजीनामे देण्याची मागणी करून अागीत तेल अाेतले जात अाहे.
बातम्या आणखी आहेत...