आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसेंचा वाढदिवस अन‌् जैन यांना जामीन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या वाढदिवशीच माजी आमदार सुरेश जैन यांना सर्वाेच्च न्यायालयातून जामीन मंजूर झाला. हे दोघेही जिल्ह्यातील मातब्बर नेते म्हणून परिचित आहेत. गुरुवारी रात्री १२ वाजेपासून खडसे यांच्या वाढदिवसाचे वॉल सोशल मीडियात व्हायरल होण्यास सुरुवात झाली होती, तर शुक्रवारी दुपारी ११ वाजता जैन यांना जामीन मिळताच त्यांचेदेखील वॉल झळकू लागले. त्यामुळे साेशल मीडियावर दिवसभर दाेन्ही नेत्यांवर शुभेच्छा संदेशांचा वर्षाव हाेत हाेता. शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये संदेश टाकण्याबाबत चढाओढ दिसून आली.
विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती ताेडण्यात आली. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनीच युती तुटल्याची घोषणा केली होती. त्यानंतर शहरात भाजपचे सुरेश भोळे हे आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी सुरेश जैन यांचाच पराभव केल्यामुळे शहरात राजकीय खांदेपालट झाली हाेती. या सर्व गोष्टींचे रिफ्लेक्शन शुक्रवारी सोशल मीडियातून दिसून आले. भाजपच्या समर्थकांनी खडसेंच्या वॉल, तर जैन यांचे समर्थक, शिवसैनिकांनी सुरेश जैन यांचे फोटो व्हाॅट्सअॅपवरून व्हायरल करण्याचा तडाखा सुरू केला. व्हाॅट्सअॅप ग्रुपच्या प्रोफाइल पिक्चरवर खडसे जैन यांचे फोटो झळकू लागले होते.

फेसबुकवर धमाका
फेसबुकवरील‘जळगावचा राजा दादा’ या अकाउंटवर जैन यांच्या जामिनाची बातमी फोटो दुपारी वाजता टाकण्यात आली. या वाॅलला सायंकाळपर्यंत सुमारे ५०० लाइक्स मिळाले होते.
सोशल मीडियावर सुरेश जैन एकनाथ खडसे यांच्याविषयी कार्यकर्त्यांनी टाकलेले संदेश.

हे हाेते संदेश
सुरेश जैन यांच्याविषयी ‘अाला रे अाला... शिवसेनेचा वाघ अाला’, ‘दादा जलगाॅंव के बाॅस’, काेणी कितीही म्हणा, मला राग येताेय; पण लक्षात ठेवा पुन्हा एकदा शिवसेनेचा वाघ येताेय’ हे संदेश हाेते, तर खडसे यांच्यावर ‘भाऊ, तुम जिअाे हजाराें साल’, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा’ अादी संदेश हाेते.
बातम्या आणखी आहेत...