आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘खडसे’कार्ड वापरून इच्छुकांचा गेम!, दूध उत्पादन वाढवण्यासाठी विशेष पॅकेज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- गुडघ्यालाबाशिंग बांधून तयार असलेल्या काही इच्छुकांना अध्यक्षपदापासून रोखण्यासाठी ज्येष्ठ आणि नवख्या संचालकांच्या फळीने अध्यक्षपदासाठी मंदाकिनी खडसे यांचे नाव लावून धरले. अध्यक्षपदी खडसेच असाव्यात म्हणून नवखे संचालक आग्रही असताना दोघा संचालकांनी मात्र संधी मिळाल्यास सोने करण्यासाठी सूचक अाणि अनुमाेदकाची व्यवस्था केली होती.
दिग्गजांनी इच्छुकांचा गेम केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. जिल्ह्याच्या राजकारणाचा फारसा अनुभव नसलेल्या काही पदाधिकाऱ्यांची दूध संघावर वर्णी लागली आहे. प्रथमच वर्णी लागूनही थेट अध्यक्षपदावर दावा सांगून काहींनी तशी हवादेखील निर्माण केली होती. तसेच पालकमंत्र्यांकडे शब्द टाकण्यासाठी प्रयत्न करून नवख्या संचालकांना फूस लावण्याचा प्रयत्नही झाला. मात्र, इच्छुकांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी दूध संघाबाहेरील राजकीय पदाधिकाऱ्यांनीदेखील देव पाण्यात ठेवले होते.

अर्धा तास अाधी निर्णय
अध्यक्षनिवडीच्या अर्धा तासाआधी संचालकांनी पालकमंत्र्यांची भेट घेतली. या वेळी बाहेरगावी निघालेल्या पालकमंत्र्यांना अडवून मंदाकिनी खडसेंच्याच नावाचा आग्रह धरला.

दूध उत्पादकांसाठी जळगावला विशेष पॅकेज
जळगावजिल्हा दूध संघाचे सक्षमीकरण करण्यात येणार अाहे. जिल्ह्यातील दूध उत्पादकांना ५० टक्के अनुदानावर दुधाळ जनावरांचे वाटप केले जाईल. दूध उत्पादन वाढवण्यासाठी जळगावला मुख्यमंत्रीदेखील विशेष पॅकेज देणार अाहेत. संचालकांच्या मताचा अादर म्हणून मंदाकिनी खडसे यांना अध्यक्ष केले अाहे. -एकनाथ खडसे,पालकमंत्री

समस्या साेडवण्यासह शिस्तीवर लक्ष देणार
दूधसंघातील प्रमुख समस्या साेडवण्यासाेबतच शिस्त लावण्यावर भर देणार अाहे. गेल्या १५ वर्षांपासून मी काेथळी येथील महिला दूध उत्पादक संस्थेची अध्यक्षा अाहे. त्यामुळे या क्षेत्रातील अनुभवाचा मला नक्कीच फायदा हाेईल. वर्षभराच्या कार्यकाळात राज्य शासनाच्या मदतीने दूध संघाचे सक्षमीकरण करण्यावर भर राहील. -मंदाकिनीखडसे, अध्यक्षा, दूध संघ.