आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात डिसेंबरपर्यंत काेणत्याही क्षणी मध्यावधी, माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे भाकित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - भाजपचे नेते तथा माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी राज्यात मध्यावधी निवडणुकीचे संकेत दिले. मंगळवारी ते धुळ्यात म्हणाले, ‘महाराष्ट्रात केव्हाही मध्यावधी निवडणूक हाेऊ शकते. शक्य झाले तर डिसेंबर महिन्यातही निवडणूक हाेईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पक्षाच्या बैठकीत ही माहिती अामच्यापुढे मांडली. गुजरात विधानसभेची निवडणूक अागामी काळात हाेईल. त्याचसोबत राज्याचीही निवडणूक हाेऊ शकते.’
 
खडसे पुढे म्हणाले, पक्षात वाद तसे नाहीत. पण भांड्याला भांडे लागतेच. अातापर्यंत अामच्यासमाेर काँग्रेस व राष्ट्रवादी हे विराेधक म्हणून भांडणासाठी हाेते. मात्र अाता तेही संपले अाहेत, त्यामुळे पक्षांतर्गत कुरबुरी हाेतात, असे ते जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे नाव न घेता खडसे यांनी सांगितले.

सरकारची भरीव कामगिरी नाही
खडसे म्हणाले, राज्यात कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे अादेश दिले जात अाहेत. राज्यात चित्र अालबेल असले तरी लाेकसभेबराेबर दाेन वर्षांनीच निवडणूक हाेईल. मात्र, अाता मध्यावधी झाली तर जनतेकडे जाताना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देता येतील, अशी काेणतीही ठाेस कामगिरी झालेली नाही.
 
 
बातम्या आणखी आहेत...