आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नैतिकता असेल तर खडसे यांनी मंत्रिपदावरून तत्काळ दूर व्हावे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव; रामानंदनगर पोलिस ठाण्याचे निलंबित पोलिस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येप्रकरणावरून राजकारण चांगलेच तापले आहे. आम आदमी पार्टी, शिवसेनेपाठोपाठ मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसने महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
सादरे यांच्या आत्महत्येशी संबंध असलेल्या मंत्र्यांचा राजीनामा मागण्याची गरजच नाही. उलट नैतिकता असेल तर महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी तत्काळ मंत्रिपदारून दूर व्हावे, अशा शब्दात खडसेंना नैतिकतेचे धडे देत राष्ट्रवादीने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणातील वादग्रस्त वाळू माफिया सागर चौधरी याने नाशिक येथील न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे.
सादरेंच्या आत्महत्येचा मुद्दा ‘आप’च्या मुंबईतील महिला नेत्याने पेटवल्यानंतर सोमवारी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेनेही त्यात उडी घेतली.त्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.सतीश पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन खडसेंवर शरसंधान साधले. ते म्हणाले, यंत्रणेच्या त्रासाला कंटाळून अशाेक सादरे यांनी अात्महत्या केली. मात्र, या प्रकरणाची नि:पक्षपणे चाैकशी करण्याएेवजी महसूलमंत्री माध्यमांसमाेर येऊन सादरे हे गुन्हेगार गुंड असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत अाहेत.
एका वाळूमाफियाकडून एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी सादरेंना निलंबित करण्यात अाले. बीएचअार पतसंस्थेच्या प्रकरणात सादरे यांनी रायसाेनींना रात्रीतून अटक केली. सादरे खंडणीखाेर असते तर कारवाई करता बीएचअारकडून त्यांनी काेट्यवधी रुपये कमावले असते. मात्र, इतरांना जे जमले नाही ते सादरेंनी केले. किमान मृत्यूनंतर तरी काेणाला चांगले म्हणण्यासाठी मनाचा माेठेपणा अावश्यक असताे; परंतु येथे तर सादरे कसे बदमाश हाेते, हे सिद्ध करण्यासाठी मुंबईपर्यंत वेळ खर्च केला जात असल्याचा अाराेपही अामदार पाटील यांनी केला.
सादरे यांनी नाेकरीवर असताना यंत्रणेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना उघडे पाडण्यासाठी पाेलिस अधीक्षकांनी हप्ते, साेने मागितल्याच्या क्लिप मिळवल्या हाेत्या. त्यावर कारवाई हाेण्याएेवजी सादरेंचेच निलंबन झाले. त्यातून नैराश्य अाल्याने त्यांनी अात्महत्येचा निर्णय घेतला. त्या क्लिपचीदेखील चाैकशी झाली पाहिजे, अशीही मागणी करण्यात अाली. या वेळी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष विलास पाटील, याेगेश देसले पदाधिकारी उपस्थित हाेते.

काँग्रेसमध्येमतभेद : सादरेअात्महत्येप्रकरणी प्रदेश काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. मात्र, जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात चुप्पी साधली अाहे.

खडसेसमर्थकाची पोलिसात तक्रार
खडसेयांचे समर्थक आणि भाजपचे माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी यांनी मंगळवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार केली असून खडसेंची बदनामी करणाऱ्या आपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती शर्मा-मेनन यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, ओबीसी विकास संघटनेनेही खडसेंना पाठिंबा दिला आहे.

पोलिस अधीक्षकांचा पदभार काढा
सादरे यांच्या बदलीची शिफारस असताना त्यांचे निलंबन केले. त्याच अधिकाऱ्यांकडून त्यांच्या अात्महत्येची चाैकशी होत अाहे. मात्र, राजकीय दबावामुळे ती नि:पक्षपणे हाेऊच शकत नाही. त्यामुळे अाराेप असलेल्या अधिकाऱ्यांना तत्काळ पदावरून दूर करून हा तपास सीबीअायकडे साेपवावा. या अधिकाऱ्यांना पदावरून दूर केल्यास राष्ट्रवादी तीव्र अांदाेलन करेल. तसेच येत्या अधिवेशनात हा विषय मांडण्यात येईल, असेही डाॅ.सतीश पाटील यांनी सांगितले.

वादग्रस्त चौधरी याचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज
अशोकसादरे यांच्या अात्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला वाळू माफिया सागर चाैधरी याने नाशिक येथील जिल्हा सत्र न्यायालयात मंगळवारी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्या अर्जावर २६ अाॅक्टाेबर राेजी सुनावणी हाेणार अाहे. हा अर्ज अॅड.मुकेश शिंपी यांनी न्यायालयात दाखल केला अाहे.

व्हायरल फिव्हर
एकनाथ खडसे सागर चौधरी सोबत असलेले वेगवेगळे फोटो दररोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मे २०१५ रोजी एका क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी अभिनेता विवेक ओबेरॉय जळगावात आला होता. या वेळी खडसेंच्या बाजूला सागर चौधरी बसलेला दिसत आहे. हा फोटो त्या दिवशीचा असल्याचे सांगण्यात येते.