आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीसाठी अध्यक्षपदाची फिल्डिंग, एकनाथ खडसेंच्या राजकारणाचा नवा अध्याय सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: राेहिणी खडसे
जळगाव - जिल्हा बँक निवडणुकीचा अंदाज बांधत सत्तेचे चित्र जवळपास स्पष्ट झाल्यामुळे ‘सहकार’ पॅनलकडून राेहिणी खडसे या बँकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून पुढे येण्याची शक्यता अाहे. यामुळे बँकेच्या अध्यक्षपदावर डाेळा ठेवून असलेल्या दिग्गजांच्या पायाखालची वाळू सरकली असून, राजकारण नव्या वळणावर येऊन ठेपले अाहे.
जिल्हा बँकेचे अध्यक्षपद मिळवणे अाणि सत्ता टिकवण्यासाठी पालकमंत्री एकनाथ खडसे यांची मर्जी मिळवणे अावश्यक असल्याचा निष्कर्ष काढत काही इच्छुकांनी तशी राजकीय समीकरणेजुळवून अाणली. सत्तेकडे यशस्वीपणे वाटचाल करताना भाजपकडून अध्यक्षपदासाठी पालकमंत्री खडसेंची कन्या राेहिणी खडसे-खेवलकर यांचे नाव पुढे येण्याची शक्यता अाहे. बँकेच्या निवडणूक अाखाड्यात उतरलेल्या खडसे समर्थकांकडून तसा प्रचार केला जात अाहे. राेहिणी खडसे या बँकेच्या अध्यक्ष झाल्यास नवीन कायद्यानुसार त्या पाच वर्षांसाठी अध्यक्ष असतील. खडसेंच्या राजकीय प्रभावामुळे त्यांना पायउतार करून संधी मिळवणे शक्य नसल्याने इच्छुकांना चिंतेने ग्रासले अाहे.
दुखावलेली मंडळी एकत्र !
राेहिणीखडसे या अध्यक्षपदाच्या उमेदवार हाेऊ नयेत म्हणून दाेन्ही गटातील हितसंबंधी मंडळी एकत्र येण्याची शक्यता अाहे. तसेच अध्यक्षपदासाठी बाशिंग बांधलेल्या काही मंडळींकडून राेहिणी खडसेंच्या पराभवासाठी समीकरणे जुळवण्याचा प्रयत्न सुरू अाहे. त्यासाठी सर्वपक्षीय पॅनलमध्ये स्थान मिळालेल्या अाणि खडसेंकडून दुखावलेली काही मंडळी एकत्र येऊ शकतात.