आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Khadse Files Charge Sheet Against Jitendra Awhad

तोडपाणी आरोपासंदर्भात जितेंद्र आव्हाडांवर खडसे दाखल करणार खटला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - विरोधीपक्षनेते एकनाथ खडसेंवर आरोप करून राजकीय खळबड उडवून दिलेल्या राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाडांनी दुसर्‍याच दिवशी एकेरी शब्द वापरल्याबद्दल जाहीर माफी मागीतली आहे. मात्र त्यात ‘तोडपाणी’ आरोपांसंदर्भात कुठलाही उल्लेख न केल्याने त्यांच्याविरुद्ध बदनामीचा खटला दाखल करण्यावर खडसे ठाम आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आव्हाड विरुद्ध खडसे अशी जुंपलेली पाहायला मिळणार आहे.


भुसावळ येथे मंगळवारी राष्ट्रवादी कॉग्रेसची बैठक पार पडली. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी विरोधीपक्षनेते खडसेंचा एकेरी उल्लेख करत तोडीपाणीचा आरोप केला होता. त्याचे पडसाद बुधवारी उमटायला सुरूवात झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी सहा ओळींचा माफीनामा प्रसिद्धीस दिला आहे. त्यात भाषण करतेवेळी अनावधानाने माझ्या तोंडून एकेरी उल्लेख झाला असेल तर जाहीर माफी मागत असल्याचे नमूद केले आहे.


राष्ट्रवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष आव्हाड मंगळवारी कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेशानिमित्त विटवा (ता.रावेर) येथे आले होते. रावेरमधील कार्यक्रमानंतर त्यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात भुसावळातील लोणारी हॉलमध्ये आढावा बैठक घेतली. पालकमंत्री संजय सावकारे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी आमदार अरुण पाटील, दिलीप सोनवणे, अँड. रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.


आव्हाड गुंडप्रवृत्तीचा व्यक्ती
यासंदर्भात खडसेंची भूमिका जाणून घेतली असता आव्हाड माझ्याशी प्रत्यक्ष बोलले नसले तरी त्यांनी माफी मागितली आहे. असे असले तरी आव्हाडांविरुध्द बदनामी केल्याप्रकरणी खटला दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले. आव्हाड हे आदर्श घोटाळ्यातील आरोपी आहे. बनावट कागदपत्र, अँफिडेव्हीट तयार करून आदर्श सोसायटीमध्ये फ्लॅट मिळवला आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल असून सीबीआयमार्फत चौकशी सुरू आहे. आव्हाडांना अटक करण्याची विधानसभेत मागणी केली आहे. गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागितली तरी त्यांच्याविरुद्ध खटला दाखल करणारच असल्याचे खडसे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.