जळगाव - शहरातील अाजच्या परिस्थितीमागे सध्या सुरू असलेले राजकारण कारणीभूत असून पालकमंत्री एकनाथ खडसे माजी आमदार सुरेश जैन यांच्यातील राजकीय वादामुळे शहराचा विकास खुंटला आहे. त्याचबरोबर अायुक्त संजय कापडणीसही यास जबाबदार अाहेत, अशी परखड मते जळगावकर नागरिकांनी व्यक्त केली. शहर विकास कर्जमुक्तीसाठी गाळ्यांच्या माध्यमातून निधी उभारण्याची अपेक्षा व्यक्त केली.
मनपाचे कर्ज आर्थिक स्थिती तसेच शहरातील अाजच्या स्थितीसंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी जनतेच्या दरबारात जाऊन मते जाणून घेतली. शहरातील पाच ठिकाणी नागरिकांना अावाहन करून अर्ज भरून घेतले. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. अर्जामध्ये अाज जे घडवलं जातंय त्याला जबाबदार काेण, जळगाव शहर भकास हाेत असताना त्यावर एकमेव पर्याय असलेल्या गाळ्यांबाबत काय निर्णय घेतला पाहिजे?, व्यक्तिगत राजकारणात जळगावकर भरडले जात अाहेत का?,जळगाव अाणि जळगावकरांकडे ठरवून दुर्लक्ष केले जात अाहे का?, कर्जमुक्त हाेऊन पुन्हा नव्याने विकासाकडे झेप घेऊ पाहणाऱ्या जळगावला वेठीस धरीत अाहेत काय?, सहज सुटू शकणाऱ्या विषयांना मुुद्दाम रखडवले जात अाहे का?, विधानसभा निवडणुकीत माेठमाेठ्या वल्गना करणारे अाता भूतकाळात घडलेल्या घटनांच्या मागे लपत अाहेत का?, अागीतून निघून फुफाट्यात पडलाे, असे वाटते का?, मनपा प्रशासनाच्या कारभारावर अापण समाधानी अाहात का?, गेल्या काही काळात जळगावची परिस्थिती अाणखी बिघडवण्यात अापण काेणाला जबाबदार मानतात? आदी प्रश्नांवर नागरिकांनी मते मांडली.
पुढे वाचा... १२१९ जणांनी नोंदवली मते