आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसे-कोल्हे वाद मिटताच रेमण्ड कंपनीचा तिढा सुटला, महिनाभरात कर्मचाऱ्यांना वेतन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महिना भरातनवीन वेतन करार करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर चार दिवस कडकडीत बंद करणाऱ्या रेमण्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अखेर शुक्रवारी दुपारी वाजेच्या सुमारास संप मागे घेतला. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विरोधात असलेले मनसेचे जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे यांनाच आपल्या युनियनचे सल्लागारपद देऊन संप मागे घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

१३ महिने वाट पाहूनही कंपनीकडून सुधारित वेतनवाढीचा करार केला जात नव्हता. त्यामुळे सोमवारी सायंकाळी वाजेपासून रेमण्ड कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. सुमारे २५० कर्मचारी सोमवार ते शुक्रवार कंपनीत तळ ठोकून होते. कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करण्यासाठी रेमण्ड कंपनीच्या दोन वेगवेगळ्या कामगार युनियनच्या माध्यमातून आमनेसामने असलेले खडसे आणि कोल्हे यांनी वादावर पडदा टाकून शुक्रवारी संप मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर कोल्हे यांच्याच हातून मशीनची कळ दाबून पुन्हा कामाला सुरुवात करण्यात आली. तसेच यापुढे समान काम, समान वेतन दिले जाईल, असा निर्णय घेण्यात आल्याचे कोल्हे यांनी जाहीर केले.

युनियनवर ताबा मिळवण्यासाठी संपाचा घाट?
रेमण्डमध्येखडसे यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार उत्कर्ष सभा ही युनियन होती. तर कोल्हे यांच्या मार्गदर्शनात खान्देश कामगार युनियन सुरू होती. दोन्ही संघटना एकमेकांच्या विरोधात होत्या. विधानसभा निवडणुकीपूर्वी गतवर्षी पगार वाढीच्याच मुद्यावरून दोन्ही संघटना एकमेकांच्या समोर ठाकल्या होत्या. वर्षभरानंतर पुन्हा हा मुद्दा समोर आला. गेल्या वर्षी खडसे विरोधी पक्षनेते होते. आता ते राज्याचे महसूलमंत्री आहेत. तर कोल्हे शहर विधानसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवार आहेत. खडसे आता सत्तेत प्रमुख भूमिका बजावत आहेत. मंत्रीपदी राहून युनियनचा कारभार चालवणे खडसेंना अडचणीचे ठरू शकते. त्यामुळेच की काय, कोल्हे यांनी संपाचा घाट घालून मान्यताप्राप्त युनियनचे सल्लगारपद पदरात पाडून घेतले, अशी शक्यता आहे.

पुढे काय?
कामगारांच्यामागण्या जशाच्या-तशा व्यवस्थापनासमोर मांडण्यात येतील. तडजोडीची वेळ आल्यास कामगारांनाच विचारले जाईल, तडजोडीअंती कामगारांचे समाधान झाले तरच करार पास केला जाईल अन्यथा पुन्हा संप झाल्यास कोल्हे कामगारांच्या सोबत राहतील.

युनियनचा वाद बाजूला
खडसे-कोल्हेयांच्या स्वतंत्र युनियन एकमेकांच्या विरोधात आहेत. मात्र, आता युनियनचे वाद बाजूला सारून सर्वच कामगारांना एकत्रित घेऊन काम करणार आहोत. आमच्या युनियनबद्दल अद्याप काहीही सांगू शकत नाही, अशी सावध प्रतिक्रिया कोल्हे यांनी पत्रकारांना दिली.

सकारात्मक चर्चेनंतर कंपनी सुरू
दोनदिवसांपूर्वी मुंबईत खडसेंची भेट घेऊन कोल्हे शुक्रवारी कंपनीत दाखल झाले. खडसेंनी कामगार उत्कर्ष सभेचे सल्लागारपद दिल्याचे पत्र त्यांनी कार्यकारी संचालक एस.ए. नागराजा यांना दाखवले. त्यानंतर तीन दिवसांपासून कंपनीत असलेल्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. आधीच्या कार्यकारिणीस १३ महिने दिले तसे मलाही काही दिवस द्या, मी महिनाभराच्या आत नवीन करार करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी कामगारांना सांगितले. कोल्हे यांच्या हाकेला देत कामगारांनी संप मागे घेतला.रेमण्डचे आंदोलन संपले, रेमण्डच्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करताना ललित कोल्हे.