जळगाव - राष्ट्रवादी पक्षाचे संघटन मजबूत करा. तसेच संघटनेसाठी संपूर्ण ताकद खर्च करा. माजी मंत्री एकनाथ खडसे अाणि विद्यमान जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे एकमेकांविरोधात काम करून जिल्ह्यातील पक्ष संपवण्याचे काम चांगल्या प्रकारे करीत आहेत, जिल्ह्यातील भाजप संपवण्यासाठी ते दोघेच पुरे आहेत. त्यामुळे विराेधकांवर बाेलण्याची किंवा टीका करून त्यांना संपवण्याची गरज नाही, असा चिमटा राष्ट्रवादीचे नेते तथा विधानसभेेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी पक्षाच्या मेळाव्यात काढला.
जिल्ह्याच्या निरीक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर विधानसभेेचे माजी अध्यक्ष वळसे-पाटील यांनी गुरुवारी राष्ट्रवादी कार्यालयात महानगर अाणि ग्रामीणचा मेळावा घेतला. खडसेंपाठाेपाठ जलसंपदामंत्री महाजनही जमिन घोटाळ्याच्या वादात अडकल्याने त्यांच्यावर वळसे- पाटील यांनी जोरदार टीका केली. त्याचबरोबर शिवसेनेवरही तोंडसुख घेतले. केंद्रातील भाजप सरकार निजामाचे आहे अशी टीका करणाऱ्या शिवसेनेला भाजपने आैरंगजेबाची उपमा दिली. तर उध्दव ठाकरेंनी सरकार नालायक असल्याचे जाहीर केले .सत्तेतील दोन्ही पक्ष आपसात भांडत असल्याने युती सरकारविरोधात जनतेत असंतोष निर्माण करणे राष्ट्रवादीला सोपे आहे असे ते म्हणाले. केवळ पदे घेऊन स्वत:ला मिरवून घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा समाचार घेतला. कामे करायची इच्छा नसेल तर पदे साेडा. तसेच ज्यांना भविष्यात अामदार खासदार हाेण्याची इच्छा असेल, त्यांनी अाताच इच्छा प्रदर्शित करा. त्यासाठी तुम्हाची याेग्यता अाेळखून तुम्हाला अातापासून पक्ष मदत करेल. निवडणुका डाेळ्यासमाेर ठेवून नियाेजनबद्धरीत्या काम करा. मी यापुढे महिन्यातून दाेन वेळा जिल्ह्यात येणार असून, प्रत्येक तालुक्यात जाऊन दाैरे करणार असल्याचेही वळसे-पाटील यांनी सांगितले.
मेळाव्यास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अामदार डाॅ.सतीश पाटील, विधानसभेेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी खासदार अॅड.वसंतराव माेरे, महानगराध्यक्ष परेश काेल्हे, अल्पसंख्याक अाघाडीचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, माजी अामदार राजीव देशमुख, दिलीप वाघ, कृषिभूषण साहेबराव पाटील, अरुण पाटील, दिलीप साेनवणे, अॅड.रवींद्र पाटील, महिला अाघाडीच्या अध्यक्षा विजया पाटील, शैलजा निकम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित हाेते.
माेदींना जनतेशी देणे-घेणे नाही
माेदींनीनिवडणूक काळात ४० सभा घेतल्या. तसेच विदेशातदेखील तेवढेच दाैरे केले; परंतु त्यांना कधी दुष्काळी भागात वा मराठवाड्यात यावेसे वाटले नाही. शरद पवारांनी सत्तेत असताना अाणि अातादेखील सातत्याने दुष्काळी भागात जाऊन जनतेच्या समस्या साेडवण्याचा प्रयत्न केला. माेदी सरकार जनतेबद्दल गंभीर नसल्याचे हे उदाहरण अाहे.
फाेटाेसेशन करणे बंद करा
इकडेपक्षाच्या कार्यालयातील बैठकांना दांडी मारणारे काही चमकाे कार्यकर्तेे मुंबईत जाऊन नेत्यांसाेबत फाेटाे काढून ते साेशल मीडियावर टाकतात. कधी पवार साहेबांसाेबत, तर कधी इतर नेत्यांसाेबतचे फाेटाे व्हायरल केले जातात. हा प्रकार चुकीचा अाहे. पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहिलेच पाहिजे. नेत्यांनीदेखील अशा फाेटाेसेशन करणाऱ्यांना तिकडे काय काम केले म्हणून जाब विचारला पाहिजे, अशी मागणी जिल्हाध्यक्ष अामदार डाॅ.सतीश पाटील यांनी वळसे-पाटील यांच्याकडे केली. तसेच मला जेलमध्ये टाकण्याची धमकी देणाऱ्या माजी मंत्री खडसेंना माझा शाप लागला अाणि त्यांचे मंत्रिपद गेले. राजकीय संकट अाल्यावर त्यांना अाेबीसींची अाठवण अाली. माजी अामदार डाॅ.बी.एस.पाटील माजी अामदार अरुण पाटील यांचा राजकीय बळी घेताना त्यांना अाेबीसी का अाठवले नाही? असा टाेला डाॅ. पाटील यांनी लगावला.
यापुढे एकच फाेटाे
पक्षाच्यामेळाव्यांचे पाेस्टर अाणि जाहिरातींमध्ये माजी खासदार अॅड.वसंतराव माेरे यांचा फाेटाे नसल्याचा विषय या वेळी निघाला. अॅड.माेरे यांच्यानंतर जिल्हाध्यक्ष अामदार डाॅ.सतीश पाटील यांनीदेखील माझाही फाेटाे नसल्याचे सांगितले. त्यावर वळसे-पाटील यांनी यापुढे पक्षाच्या पाेस्टरवर केवळ शरद पवार यांचाच एकमेव फाेटाे ठेवण्याचे अादेश दिले.
निवडणुकांचे नियाेजन
अागामीनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने हा मेळावा अायाेजित केला हाेता. त्यात कार्यकर्त्यांची सार्वजनिक मते जाणून घेतली. यापुढे वैयक्तिक मते जाणून घेऊ अाणि नियाेजन करू. काही कार्यकर्त्यांची गाऱ्हाणीदेखील एेकून घेतली. खडसेंच्या राजीनाम्यानंतर अाम्ही सक्रिय झालाे, हा अाराेप चुकीचा असल्याचे दिलीप वळसे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सरकारला स्थिर हाेण्यासाठी दाेन वर्षांचा वेळ दिला हाेता. अाता अाम्ही अाक्रमक झालाे अाहाेत. अामची भूमिका दुटप्पी नाही. खडसेंपाठाेपाठ अाता गिरीश महाजन यांचीदेखील जमिनीची माहिती लपवण्याच्या प्रकरणात चाैकशी झाली पाहिजे, अशी मागणी वळसे-पाटील यांनी केली.
दांडीबहाद्दर नगरसेवकांचा वर्ग
महानगरचामेळावा असूनदेखील त्यास केवळ दाेनच नगरसेवक उपस्थित हाेते. या प्रकाराबद्दल वळसे-पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दिवसभराच्या बैठकांनंतर सायंकाळी नगरसेवकांचा वेगळा वर्ग घेणार असल्याचे सांगून पक्षातून इधर-उधर उड्या मारणाऱ्यांवरही कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.