आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Khadse News In Marathi, Adarsh Housing Scam, Jitendra Awhad, Divya Marathi

'जितेंद्र आव्हाड एक आदर्श घोटाळ्यातील आरोपी असून ते केव्हाही जेलमध्‍ये जातील'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जळगाव महानगरातील भाजप बूथप्रमुखांचा मेळावा रविवारी दुपारी 12 वाजता ब्राह्मणसभा येथे आयोजित करण्यात आला होता. या वेळी खडसेंनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी केलेल्या वक्तव्यावर बोलताना खडसेंनी टीका केली. कोण आहे हे आव्हाड? ते आदर्श घोटाळ्यातील एक आरोपी आहेत. बनावट कागदपत्रे दिले म्हणून त्यांची सीबीआय चौकशी सुरू आहे. त्यामुळे ते केव्हाही जेलमध्ये जातील. कारण मी सांगतो ते खरेच होते, असेही खडसे म्हणाले.


उमेदवारांसंदर्भात पुनरुच्चार
या वेळी खडसेंनी जळगावातून ए.टी.पाटील व रावेरमधून रक्षा खडसे यांची उमेदवारी निश्चित असल्याचा पुनरुच्चार केला. उमेदवार कोण? यापेक्षा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवणे हे आमचे लक्ष्य आहे, असेही ते म्हणाले. तसेच रावेरमधील उमेदवारी बदलण्यामागील कारणांचा ऊहापोहदेखील त्यांनी केला. त्याचप्रमाणे केंद्र व राज्यातील सरकारवर कडाडून टीका करत राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी 15 वर्षांत सरकारने कोणती ठोस कामे केली याचा लेखाजोखा देण्याचे आव्हान करत प्रतिस्पध्र्यांना टीकेचे लक्ष्य केले.


खुर्च्या काढून सतरंज्या अंथरल्या
शहरातील 378 बूथप्रमुखांनी मोठय़ा संख्येने हजेरी लावल्याने सभागृह खचाखच भरले होते. गर्दी वाढत असल्याचे लक्षात येताच कार्यकर्त्यांनी बसण्यासाठी टाकलेल्या खुच्र्या काढून घेत सतरंज्या अंथरून भारतीय बैठकीचा पर्याय निवडला. या वेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष उदय वाघ, खासदार ए.टी.पाटील, जिल्हा संघटक अँड.किशोर काळकर, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, दीपक सूर्यवंशी, दीपक फालक, डॉ.सुरेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. याप्रसंगी अनेकांनी भाजपत प्रवेश केला.


आमदार महाजन आलेच नाहीत
राष्ट्रवादीच्या आव्हाड यांनी भाजपत दोन गट असल्याचा आरोप केल्यानंतर या मेळाव्यात खडसे व महाजन एकत्र येतील, अशी आशा कार्यकर्त्यांना होती. तसेच आमदार महाजन येताहेत, असेही सांगितले जात होते; परंतु मेळावा संपला तरीदेखील आमदार महाजन न आल्याने याबाबत चर्चा सुरू होती.


विरोधक म्हणतात, खडसे-महाजन यांच्यात वाद आहेत. वाद राहणारच; पण तो तत्त्वांचा आहे. काल रात्री आम्ही दोघे सोबत होतो. आमच्यात गटबाजी नाही. गणपती पाण्यात बुडवला तरी उपयोग नाही. आम्ही एकत्र आहोत याचीच विरोधकांना भीती असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केले.