आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूध संघावर खडसेंच्या पॅनलला एकहाती सत्ता, गीता चाैधरींसह सर्व उमेदवार पराभूत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्हा दूध संघाच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सर्वच्या सर्व जागांवर पालकमंत्री एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वातील सर्वपक्षीय पॅनलला विजय मिळाला; तर विराेधातील गीता चाैधरी यांच्या पॅनलला पराभव पत्करावा लागला. चाैधरी स्वत: रावेरमधून लढत हाेत्या. त्यांचा १३४ मतांनी पराभव झाला. यापुर्वीच सर्वपक्षीय पॅनलच्या जागा बिनविराेध निवडून अाल्या अाहेत.

दूध संघाच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमाेजणीला महाबळ रस्त्यावरील हतनूर हाॅल येथे सकाळी वाजता प्रारंभ झाला. निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित भांडेपाटील यांनी सकाळी ९.४५ वाजता निकाल जाहीर केला. जिल्हाभरात एकूण ३७५ पैकी ३७४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यातील ३० मते अवैध ठरली; तर भडगावात धनराज पाटील, चाेपड्यात मनाेज पाटील अाणि महिला राखीव मतदारसंघातून जाहीर माघार घेतलेल्या साेनल पवार या तीन उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. अॅड.वसंतराव माेरे यांच्यासह काही राजकीय पदाधिकारी मतमाेजणीच्या वेळी उपस्थित हाेते. १० वाजेनंतर प्रमाणपत्र घेण्यासाठी उमेदवार मतमाेजणीच्या ठिकाणी उपस्थित झाले.

पैसा अन् दबावाचे राजकारण.......
दूधसंघाची निवडणूक ही दिग्गज राजकारण्यांसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न हाेता. दूध उत्पादकांना याेग्य स्थान दिल्याने अाम्ही लढलाे. परंतु, निवडणुकीत विराेधकांनी साम, दाम, दंड, भेदाची नीती वापरली. पैशांचा माेठ्या प्रमाणावर वापर झाला. सामान्य मतदारांवर दबाव टाकून मतदान करण्यास भाग पाडण्यात अाले. प्रत्येक मतदाराला २५ हजार रुपयांचे अामिष देण्यात अाले. शिवाय मंत्र्याचे पॅनल असल्याने विराेधात मतदान केले, तर पुढे अडचणी येऊ शकतात. त्यामुळे मतदारांचा नाइलाज झाला. - गीता चाैधरी, पराभूत उमेदवार, रावेर

अध्यक्षपदाचा निर्णय पालकमंत्रीच घेतील. पॅनलमध्येराष्ट्रवादीच्या संचालकांची संख्या दाेनच अाहे. त्यामुळे अाम्हाला अध्यक्षपदाबाबत बाेलण्याचा अधिकार नाही. सर्व निर्णय पालकमंत्री एकनाथ खडसे हेच घेणार असून अध्यक्षपद भाजपकडेच राहणार अाहे. -अॅड.वसंतराव माेरे, संचालक, जिल्हा दूध संघ

विजयी उमेदवार
डाॅ.संजीवपाटील, मधुकर राणे, प्रमाेद पाटील, अशाेक चाैधरी , प्रल्हाद पाटील (विजयी), सुभाष टाेके, चिमणराव पाटील, जगदीश बढे, मंदाकिनी खडसे, साधना पाटील, अॅड.वसंतराव माेरे. बिनविरोध असे- यावल- हेमराज चाैधरी, पाचाेरा- किशाेर पाटील, जळगाव- सुरेश भाेळे, एरंडाेल- अशाेक पाटील, भुसावळ - श्यामल झांबरे, अमळनेर- उदय वाघ, अनुसूचित जाती प्रवर्ग- श्रावण ब्रह्मे, वि. जाती प्रवर्ग- सुनीता पाटील.