आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसे, पाटलांची न्यायालयात हजेरी, 2 मेपर्यंत तोडजोड करा : कोर्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 जळगाव- राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे महसूलमंत्री असताना त्यांच्यावर गेल्या वर्षी पॉलिहाऊस, मुक्ताई साखर कारखान्यासह जिल्हा बँक अाणि इतर भ्रष्टाचाराचे जाहीर आरोप केले होते. याप्रकरणी खडसे यांनी गुलाबराव पाटलांविरुद्ध जिल्हा न्यायालयात  १ जानेवारी २०१६ राेजी ५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. याच दाव्याच्या प्रकरणात तडजोडीसाठी दाेघांनी शनिवारी न्यायालयात हजेरी लावली. न्यायाधीशांसमाेर १ तास दाेन्ही नेते अाणि वकिलांमध्ये चर्चा झाल्यावर न्यायालयाने २ मेपर्यंत विचार करण्याची संधी दिली. 
  
सहकार राज्यमंत्री पाटील यांनी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे महसूलमंत्री असताना त्यांनी पदाचा दुरुपयोग करून पॉलिहाऊस अनुदान, मुक्ताईनगर साखर कारखाना आणि इतर कृषीविषयक बाबींमध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले होते. पाटील यांचे अाराेप बिनबुडाचे असल्याचे सांगून खडसे यांनी १ जानेवारी २०१६ राेजी जिल्हा न्यायालयात ५ काेटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा  दाखल केला होता. गुलाबराव पाटील यांच्या मुलाच्या लग्नाच्याच दिवशी जिल्हा न्यायालयात दावा दाखल झाल्याने राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली होती. दाव्याच्या कामकाजातील युक्तिवादाला अद्याप सुरुवात झालेली नव्हती. दाेन्ही पक्षांनी तडजोडीची तयारी दर्शवत न्यायालयात अर्ज दाखल करून आज न्यायालयात हजेरी लावली. दरम्यान, आता २  मे रोजी होणाऱ्या सुनावणीकडे जळगावसह राज्यातील एकनाथ खडसे आणि गुलाबराव पाटील  यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे.
 
त्यांनी विनाअट दावा मागे घ्यावा   
- अब्रुनुकसानीच्या दाव्यात दोघांनी तडजोड करावी यासाठी न्यायालयाने आम्हाला बोलावले होते. न्यायालयाने सांगितले की, तुम्ही राज्याचे लाेकप्रतिनिधी अाहात. दाेघांनी तडजाेड करावी. तसेच याप्रकरणी मी माझे उत्तर न्यायालयात दाखल केले अाहे. त्यांनी विनाअट दावा मागे घ्यावा. अामचे काहीही म्हणणे नाही. - गुलाबराव पाटील, सहकार राज्यमंत्री   

अाराेप बिनबुडाचे...   
- राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी माझ्यावर केलेल्या आराेपांमध्ये काहीच तथ्य नाही. सर्व अाराेप बिनबुडाचे अाहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध मी पाच कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्या दाव्याच्या तडजाेडीसाठी न्यायालयाने बोलावलेले होते. न्यायाधीशांसमाेर चर्चा होऊन पुढच्या तारखेपर्यंत संधी दिली आहे. एकनाथराव खडसे, माजी महसूलमंत्री
बातम्या आणखी आहेत...