आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Khadse Tie Rubin On Eyes? Gulabaro Patil Questions Over Crop Loan

खडसेंनी डोळ्यांवर पट्टी बांधली होती का? गुलाबराव पाटील यांचा पीक कर्जावरून सवाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - धरणगाव तालुक्यात टिश्युकल्चर केळीसाठी २०० कोटींच्या कर्जवाटपाच्या घोटाळ्याबाबत जिल्हा बँकेचे संचालक असलेले एकनाथ खडसे यांनी बँकेला सावध केले नाही. जिल्हा बँकेत पीक कर्ज वाटपाचे वस्त्रहरण होत असताना खडसे यांनी डाेळ्यांवर पट्टी बांधली होती का? असा प्रश्न आमदार गुलाबराव पाटील यांनी उपस्थित करत खडसेंवर टीका केली.

पीक कर्जाचे पुनर्गठण पीक कर्जवाटपाबाबत गुलाबराव पाटील यांनी सोमवारी शेतकऱ्यांसह जिल्हा उपनिबंधक कार्यालय गाठले. त्या वेळी जिल्हा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र देशमुख यांना तेथे बोलावण्यात आले. पीक कर्जवाटप पुनर्गठणाच्या मुद्द्यावरून आमदार पाटील यांनी देशमुख यांना चांगलेच फैलावर घेतले. ते म्हणाले, पीक पेऱ्याच्या उताऱ्याशिवाय कर्जवाटप करण्यात येणार नाही. त्याचप्रमाणे केळीसाठी कर्जवाटप करताना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बघा, असे धोरण जिल्हा बँकेने अवलंबलेले आहे. त्यामुळे पुरेसे कर्ज मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात उभे राहावे लागत आहे, अशा परिस्थितीमुळे शेतकरी आत्महत्या वाढतील. त्याला जिल्हा बँकेचे संचालक जबाबदार राहतील, असा इशाराही त्यांनी दिला. जिल्हा उपनिबंधक संजय राऊत यांनाही पीक कर्ज पुनर्गठणाबाबत त्यांनी जाब विचारला.

...तर शेअर परत करु
शेतकऱ्यांच्या ९० कोटी रुपयांच्या शेअर्सवर जिल्हा बँक राज्य शिखर बँकेकडून हजार कोटींचे कर्ज मिळवते. त्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण होऊन कर्जवाटप झाल्यास शेतकऱ्यांचे शेअर्स परत करु, असे गुलाबरावांनी सांगितले.

...तर खडसेंची मुलगी चेअरमन नसती
पीक कर्जवाटपाच्या घोळाबाबत संचालक असलेले एकनाथ खडसे यांनी बँकेला सावध केले नाही. तेव्हा त्यांना ते दिसले नाही. त्यांना दिसले असते तर निवडणूक झाली नसती. ते संचालक अन् मुलगी चेअरमन झाली नसती. धरणगाव तालुक्यात २०० कोटी रुपयांच्या टिश्युकल्चर कर्जवाटप घोटाळ्याचे तलाठी, तहसीलदार आणि जिल्हा बँकेचे एमडी खरे झारीतील शुक्राचार्य आहेत. त्यांना निलंबित करण्याची मागणीही त्यांनी या वेळी केली.

शेतकऱ्यांना १०० कोटींचे कर्जवाटप
जिल्हा बँकेतर्फे शेतकऱ्यांना आतापर्यंत १०० कोटींचे पीक कर्जवाटप केलेले आहे. शासनाच्या नियमानुसार नाबार्ड रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार पीक कर्जाच्या पुनर्गठणाची कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हा बँकेचा कोणताही सभासद शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही. - जितेंद्र देशमुख, एम.डी., जेडीसीसी बँक