आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Khadse's Expenditure Rejected By Yaval Municipal Council

खडसेंच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाचा खर्च सभेने नाकारला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल - यावल पालिकेच्या विविध विकास कामांचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत २६ डिसेंबरला झाले होते. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका छापण्यापासून ते कार्यक्रमावर झालेल्या खर्चास कार्योत्तर मंजुरीचा विषय शुक्रवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला होता. मात्र, तांत्रिक अडचणी असल्याने हा विषय रद्द करणे भाग पडले.
पालिकेच्या सभागृहात नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर एकूण २१ विषय होते. त्यात गेल्या वेळी तहकूब करण्यात आलेले नगरपालिका हद्दीतील गट क्रमांक ७६० आणि ७६१मधील खुली जागा रहेनुमा एज्युकेशन सोसायटी, तर गट क्रमांक ७५३मधील खुला भूखंड फरहान एज्युकेशन सोसायटीला देण्याचा निर्णय घेण्यात आला. बुरूज चौक ते बोरावल गेटपर्यंत रस्ते डांबरीकरण, शहरातील विविध रस्ते कामांच्या प्राप्त निविदांना मंजुरी देण्यात आली.

दरम्यान, शहरात पालकमंत्री एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत २६ डिसेंबर २०१५रोजी विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी छापलेल्या निमंत्रण पत्रिका तसेच संपूर्ण कार्यक्रमावर झालेल्या खर्चास कार्योत्तर मंजुरीचा विषय क्रमांक १८नुसार सर्वसाधारण सभेत सभागृहासमोर ठेवण्यात आला होता. मात्र, तांत्रिक कायदेशीर अडचण निर्माण झाल्याने हा विषय रद्द करावा लागला. अर्ध्या तासात आटोपलेल्या या सभेला विरोधी गटातील केवळ एकमेव सदस्या उपस्थित होत्या. मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांच्यासह सत्ताधारी गटातील सर्व सदस्य उपस्थित होते.

पाणी बचतवर सखोल चर्चा
सभागृहातऐनवेळी असलेल्या विषयानुसार पाटबंधारे विभागाकडून तीन महिन्यांनंतर पाण्याचे आवर्तन सोडले जाईल, असे सांगण्यात आले. यामुळे सध्या उपलब्ध होणारे पाणी काटकसरीने वापरणे, जलवाहिनीची गळती थांबवणे, साठवण तलाव दुरुस्ती आणि पर्यायी व्यवस्थेबाबत सभेत सखोल चर्चा झाली.

विकास आराखड्यासाठी आर्किटेक्ट
शहराचीमध्यंतरी हद्दवाढ झाली होती. यानंतर पालिका हद्दीत समाविष्ट भागासाठी पालिकेला तीन कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहेत. या निधीचा विनियोग करण्यासाठी संबंधित भागाचा विकास आराखडा तयार करण्यासाठी आर्किटेक्ट नेमणुकीचा निर्णय सभागृहाने घेतला. यामुळे कामांचे नियोजन करणे सोपे होईल.