आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खान्देशातील 27 जण ठरले ‘पोलिस उपनिरीक्षक’पदी पात्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - खान्देशातील ग्रामीण भागातही गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध झाली असून, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील किमान 27 जणांची पोलिस उपनिरीक्षकपदासाठी अंतिम निवड झाली आहे. धुळय़ातील विजय गोपाळ धर्मा याने, तर एन.टी. संवर्गातून राज्यात दुसरे स्थान पटकावले आहे. बुधवारी जाहीर झालेल्या निकालात निवड झालेल्यांमध्ये खान्देशातील 8 तरुणींचा समावेश आहे. 25 उमेदवार ‘दीपस्तंभ’चे, तर दोन दर्जी फाउंडेशनचे विद्यार्थी आहेत. नागसेन सावळे हा अनुसूचित जाती संवर्गातून आठव्या स्थानी आहे.


निवड झालेले खान्देशातील उमेदवार
विजय धर्मा (धुळे), अमोल गोविंदराव पवार (पाचोरा), किरण राजेंद्र पाटील (अमळनेर), धर्मराज भरतसिंग पटले (धुळे), प्रवीण शंकर सोनवणे (मुक्ताईनगर), सविता सदावर्ते (जळगाव), सुवर्णा पांडुरंग महाजन (पारोळा), चेतन रमेश मराठे (दोंडाईचा), गजानन अर्जुन गोटे (चांगदेव), प्रशांत र्शीकृष्ण जंगले (काटी जिल्हा बुलडाणा), भूषण दिनकर सोनार(शिरसाळे), गोपीचंद नेरकर (कन्हेरे), योगिता गबरू राठोड (सारवे), मनीषा अरुण पाटे (चाळीसगाव), विशाल राजेंद्र पाटील(माळशेवगे), राजेंद्र लोटेश सोनवणे (भुसावळ), सुनील जगन्नाथ पवार (धुळे), हेमंत विजय मोहिते (जळगाव), ज्योत्स्ना भालचंद्र ठाकरे(जळगाव), वर्षा सुधाकर पाटील (जळगाव), चांदणी सुभाष पाटील (अमळनेर), नीलेश विठ्ठल गायकवाड (मोंढाळे), दीपक बापुराव वारे (कासोदा), सौरभ पिंगळे (जामनेर), अमृता सुभाष राजपूत (चाळीसगाव), नागसेन सावळे आणि योगेश पाटील.