आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एरंडोल: खान्देश अॅग्रो एजन्सीला भीषण आग, लाखो रुपयांचा माल जळून खाक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एरंडोल- जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील खान्देश अॅग्रो एजन्सीला पहाटे चार वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

मिळालेली माहिती अशी की, खान्देश अॅग्रो एजन्सीला लागलेल्या आगीत बि-बियाणे, फवारणीचे औषधी, किटकनाशके, किलोस्कर मशीनचे स्पेअर्स पार्ट्‍स तसेच शेतीची अवजारे जळून खाक झाली आहेत.

नम्रता गणेश मंडळाचे पदाधिकारी सभामंडपाची साफसफाई करताना खान्देश अॅग्रो एजन्सीमधून धूर निघत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने  दुकानाचे शटर तोडून आग विझवण्याचा प्रयत्न केला. एरंडोल नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. जवानांनी सकाळी नऊ वाजता आगीवर नियंत्रण मिळवले.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. खान्देश अॅग्रो  एजन्सीला लागलेल्या आगीचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...