आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खान्देश महोत्सवाचे मार्चमध्ये आयोजन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जिल्हा प्रशासनातर्फे येत्या 24 जानेवारी रोजी खान्देश महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते; मात्र 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन तसेच जिल्हा परिषद निवडणुकांची आचारसंहिता यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे खान्देश महोत्सव मार्च महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे.
खान्देश महोत्सवाला गेल्या वर्षी मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर यंदाही महोत्सव घेण्यात येत आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने गेल्या महिन्यात नियोजन केले होते. आणि लवकरच हा महोत्सव पार पडणार होता. परंतु निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर तयारी करून मार्चमध्ये या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. महोत्सवासाठी निधीची तरतूद करण्यासाठी या कालावधीत वेळदेखील मिळणार असल्याने जिल्हा प्रशासनाकडून महोत्सवाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. मागील वर्षी जिल्हास्तरावर ‘मुक्ताई सरस’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.