आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षुल्लक कारणावरून खान्देश सेंट्रलच्या सिक्युरिटी, सुपरवायझरला मारहाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - लिफ्टमधून चढ-उतार करण्याच्या कारणावरून उद््भवलेल्या शाब्दिक वादातून बुधवारी दुपारी वाजता खान्देश सेंट्रलमधील सिक्युरिटी सुपरवायझर चंदन अढायके रामकृष्ण तोसमड या दोघांना अनोळखी युवकांनी मारहाण केली.

खान्देश सेंट्रलमध्ये असलेल्या लिफ्टजवळ दोन युवक एक युवती असे ितघे थांबलेले होते. त्यातील एक युवक वारंवार लिफ्टचे बटण दाबत होता. त्यामुळे चंदन भीमराव अढायके (वय ३०, रा.सातूर-खुडवद, ता.यावल) याने त्या युवकाला हटकल्याने त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर अढायके याने त्याला बाहेर आणले. त्याच वेळी त्या युवकाने खान्देश सेंट्रल परिसरात सुरू असलेल्या लग्नातून काही युवकांना फोन करून बोलावून घेतले. या चार-पाच युवकांनी एकत्र येऊन अढायके रामकृष्ण तोसमड (वय ५१, रा.औरंगाबाद) यांना लोखंडी रॉडने मारहाण केली.

या मारहाणीत अढायके यांच्या पाठीवर वळ उमटले होते. तसेच त्यांच्या कमरेला मुका मार बसला होता. दोघांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.