आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाविआची कार्यकारिणी ‘घरकुल’ वगळून जाहीर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने सत्ताधारी खान्देश विकास आघाडीने आपली नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीत घरकुलाचा मुद्दा वादग्रस्त ठरणार असल्याने 11 सदस्यीय समितीत घरकुलाशी संबंधित एकाही सदस्याला स्थान देण्यात आलेले नाही. तसेच अध्यक्षपदाची धुरा रमेश जैन यांनी आपल्याकडेच ठेवली आहे.

आमदार सुरेश जैन यांच्या मार्गदर्शनाखाली चालणार्‍या खान्देश विकास आघाडीची दोन दिवसांपूर्वी सभा झाली. या सभेत उपाध्यक्षपदी विष्णू भंगाळे, शैलेंद्र इंगळे, सेक्रेटरीपदी राजकुमार आडवाणी व कोषाध्यक्षपदी महेंद्र जैन, तर कार्यकारी अध्यक्षपदी करीम सालार यांची निवड झाली आहे. तसेच मॅनेजमेंट कमिटी सदस्यांमध्ये सुनील महाजन, नितीन बरडे, मनोज चौधरी, राजेश शिरसाठ व दीपक सराफ यांना स्थान देण्यात आले आहे. या नवीन कार्यकारिणीतून घरकुलप्रकरणी आरोपांचा ठपका असलेल्यांना वगळण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या निवडणुकीत खान्देश विकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले होते. त्यामुळे या वेळीसुद्धा स्पष्ट बहुमत मिळवणार असल्याचा विश्वास रमेश जैन यांनी व्यक्त केला आहे.

अशी होती जुनी कार्यकारिणी : खान्देश विकास आघाडीची 2007मध्ये अधिकृत नोंदणी झाली होती. या वेळी नियुक्त झालेल्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी अँड. शरद वाणी, सेक्रेटरी प्रकाश बाबूराव पाटील, कोषाध्यक्ष महेंद्र जैन, कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रायसोनी, उपाध्यक्ष लक्ष्मीकांत चौधरी, मॅनेजमेंट कमिटीत सदस्य जितेंद्र मुंदडा, प्रमोद झवर, प्रकाश पाटील यांचा समावेश होता.