छायाचित्र: भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रा. अस्मिता पाटील यांना पेढा देताना महसूलमंत्री एकनाथ खडसे.
जळगाव - स्वच्छ चारित्र्य असलेले, गुन्हेगारी प्रवृत्ती नसलेले राजकीय क्षेत्रात काम करणा-यांसाठी भारतीय जनता पक्षाचे दरवाजे कायम उघडे आहेत. पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी अजून अनेकांचा प्रवेश व्हायचा आहे. त्यात खान्देश विकास आघाडीसह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचाही समावेश आहे, असे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रा.डॉ.अस्मिता पाटील यांचा भाजपतील प्रवेश सोहळा महसूलमंत्री खडसे यांच्या उपस्थितीत रविवारी झाला. या वेळी प्रा.पाटील यांच्या प्रवेशाला भाजपतून विरोध नसल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले. त्या कॉंग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्या असून, त्यांनी बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे उत्तम संघटन केले आहे. तसेच राज्यभर दौरे करून त्या राजकीय शैक्षणिक क्षेत्रात काम करीत आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये येण्याची इच्छा व्यक्ती केली होती. त्या विधानसभेसाठी इच्छुक होत्या. पाचोरा भाजप इतर तालुक्यांच्या तुलनेत संघटनात्मकदृष्ट्या मागे असल्याने राष्ट्रवादीसह मनसे अन्य पक्षांतील पदाधिका-यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. तसेच पाचोरा भडगावच्या काही नगरसेवकांचा प्रवेश सोहळाही लवकरच होणार असल्याचेही खडसे यांनी स्पष्ट केले. यासह माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणे यांच्यासह चोपडा साखर कारखान्याच्या काही संचालकांनीही इच्छा व्यक्त केल्याने त्यांच्या पक्षप्रवेशाचेदेखील त्यांनी संकेत दिले.
पुढे वाचा प्रा.पाटील यांना विरोध नाही