आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगाव महानगरपालिका निवणुकीसाठी खान्देश विकास आघाडीचे सर्वाधिक 103 अर्ज दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा टप्पा आटोपला असून 75 जागांसाठी तब्बल 901 अर्ज दाखल झाले आहेत. यात बहिष्काराच्या मानसिकतेत असलेल्या खान्देश विकास आघाडीने 75 जागांसाठी सर्वाधिक 103 अर्ज दाखल केले. त्यात 28 जागांसाठी दोन पर्याय ठेवले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने 7 जागांवर उमेदवार न देता 68 जणांची यादी जाहीर केली.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस असल्याने अपेक्षेनुसार महापालिकेत तुफान गर्दी झाली होती. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना आवर घालताना पोलिस प्रशासनाची खर्‍या अर्थाने परीक्षाच झाली. सकाळपासून दुपारी 3 वाजेपर्यंत म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची धावपळ सुरूच होती. अनेक राजकीय पक्षांचे एबी फॉर्म येण्यास उशीर झाल्याने इच्छुकांना घाम फुटला होता.

दुपारी टेन्शन सायंकाळी आनंद
आयुक्तांनी वसुलीची नोटीस बजावल्याने खान्देश विकास आघाडीतील बहुसंख्य नगरसेवकांचे चेहरे पडले होते. ‘आधी अर्ज भरून ठेवा, वेळेवर बघू’ असा निरोप दुपारी नेत्यांची बैठक आटोपल्यावर आल्यानंतर दुपारी 3 वाजेपर्यंत उर्वरित सगळे महापालिकेत धाव घेत स्वत:चा व परिवारातील सदस्याचा अर्ज दाखल करीत होते. आजअखेर खाविआच्यावतीने 75 जागांसाठी तब्बल 103 अर्ज दाखल केले. आगामी काळातील अडचणी लक्षात घेता 28 जागांवर दोन पर्याय देण्यात आले. मात्र सायंकाळी खंडपीठाचा निर्णय येताच दुपारपासून टेन्शनमध्ये असलेल्या चेहर्‍यांवर हास्य फुलल्याचे दिसले. निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाल्याच्या भावना स्पष्ट जाणवत होत्या.